Zubeen Garg bollywood singer esakal
मनोरंजन

Zubeen Garg Hospitalized: 'या अली','दिल तू ही बता' गाण्यांचा लोकप्रिय गायक

गँगस्टर चित्रपटातील 'या अली' गाण्यामुळे रातोरात फेमस झालेलया झुबीन गर्गच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी आहे

युगंधर ताजणे

Zubeen Garg bollywood singer: गँगस्टर चित्रपटातील 'या अली' गाण्यामुळे रातोरात फेमस झालेलया झुबीन गर्गच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी आहे. (bollywood news) ती म्हणजे झुबीनच्या डोक्याला दुखापत झाल्यानं त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, झुबीन (Bollywood singer) बाथरुममध्ये बेशुद्ध होऊन पडला होता. त्यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

आपल्या आगळ्या वेगळ्या प्रकारच्या गायकीनं चाहत्यांमध्ये लोकप्रिय झालेल्या (bollywood movies) झुबीनची नेहमीच चर्चा होत असते. तो सोशल मीडियावर सक्रिय असणारा सेलिब्रेटी आहे. त्याच्या गाण्यांना मिळणारा प्रतिसादही मोठा असतो. झुबीन हा लाईव्ह शोमधून अनेकदा परफॉर्म करताना दिसला आहे. त्याला झालेल्या दुखापतीनंतर चाहत्यांनी काळजी व्यक्त केली आहे. असं सांगितलं जात आहे की, जुबीन एका हॉटेलमध्ये थांबला होता. त्यावेळी बाथरुममध्ये तो पडला आणि त्याच्या डोक्याला दुखापत झाली. बेशुद्ध अवस्थेत असणाऱ्या झुबीनला आता डिब्रुगढ येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

झुबीनला काल आसाम वरुन वेगळ्या ठिकाणी शिफ्ट करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डॉक्टरांनी सीटी स्कॅन केलं असून त्याच्यावर पुढील उपचार सुरु केले आहेत. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा यांनी डॉक्टरांकडे चौकशीही केली आहे. याशिवाय त्या राज्याचे आरोग्यमंत्री केशव महंता यांनी देखील झुबीनच्या आरोग्याची विचारपूस केली आहे. डॉक्टरांनी सांगितले की, झुबीनच्या डोक्याला मार लागला आहे. त्याला टाके घालण्यात आले आहे.

झुबीनविषयी सांगायचे झाल्यास त्यानं आसामी भाषेशिवाय बंगाली, हिंदी भाषेतही गायन केले आहे. हिंदीमधील त्याचे या अली आणि दिल तू ही बता ही गाणी चाहत्यांची विशेष प्रिय आहेत. 1992 मध्ये आलेल्या अनामिका या चित्रपटातून झुबीननं संगीतकार आणि गायक म्हणून पदार्पण केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway: कोकणकन्या, मांडवी एक्स्प्रेसचे डबे वाढणार, लांब पल्ल्याचा प्रवास आरामदायी होणार! रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Marriage Blessing Temple India : अजूनही 'सिंगल' आहात? लग्न ठरत नाहीये? 'या' प्राचीन मंदिरात कमरेला माळ बांधून फक्त 9 प्रदक्षिणा मारा, मग लग्न ठरलंच म्हणून समजा...!

Gudi Padwa 2026: यंदा गुढी पाडवा 18 की 19 मार्चला? जाणून घ्या तारीख, वेळ, शुभ मुहूर्त अन् सणाचे महत्त्व

Love Marriage : 'या' ठिकाणी मुलींच्या लव्ह मॅरेजला फूल पर्मिशन; आवडला पुरुष की कर लग्न! वाटेल तेव्हा घटस्फोट, शेजारील देशाशी आहे संबंध

Latest Marathi News Live Update : दादर रेल्वे स्टेशन परिसर फेरीवालामुक्त, पालिका-पोलीस संयुक्त धडक कारवाई

SCROLL FOR NEXT