rain sakal
Maratha Agitation

हिंगोलीत मेघगर्जनेसह जोरदार पाऊस

हा पाऊस हिंगोली, कळमनुरी, औंढा व वसमत तालुक्यातील बहुतांश भागात झाला.

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : जिल्ह्यात दोन दिवसापासून सायंकाळी रिमझिम होणाऱ्या पावसाने शनिवारी ता. चार मेघगर्जनेसह जोरदार आगमन केले असुन दिडतास जोरदार पाऊस झाला त्यानंतर पालसाची रिमझिम सुरू होती. हा पाऊस हिंगोली, कळमनुरी, औंढा व वसमत तालुक्यातील बहुतांश भागात झाला.

जिल्ह्यात मागच्या दोन दिवसापासून दिवसभर पाऊस उघडीप देत होता सायंकाळी मार रिमझिम पाऊस सुरू होता. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजाप्रमाणे आज सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. काही वेळ ऊन देखील पडले होते. दुपारी तीन वाजता ढगाळ वातावरण निर्माण झाले त्यानंतर मेघगर्जनेसह जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले. हा पाऊस हिंगोली, कळमनुरी, औंढा व वसमत तालुक्यातील अनेक गावात झाला आहे.

पिकांच्या वाढीसाठी पाऊस आवश्यक असल्याचे शेतकरी सांगत आहेत. मागच्या आठवड्यात काही दिवस पावसाची झड होती. त्यानंतर पावसाने उघडीप दिली. सध्या सोयाबीन पिकांला शेंगा लागत आहेत. त्याच्या वाढीसाठी पाऊस आवश्यक होता असे शेतकरी सांगत आहेत.

दरम्यान, हा पाऊस हिंगोली तालुक्यातील सिरसम, बासंबा, कनेरगाव, फाळेगाव, नर्सी, सवड, केसापुर, घोटा, बळसोंड, अंधारवाडी, कारवाडी आदी ठिकाणी झाला. कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा, वारंगा, सुकळी, बोल्डा, पोतरा, येहळेगाव गवळी, असोला, नांदापुर, सोडेगाव आदी ठिकाणी झाला.

वसमत तालुक्यातील गिरगाव, कुरुंदा, कोठारी, वापटी, कुपटी, खांबाळा, खापरखेडा, पांगरा शिंदे आदी गावात झाला औंढा नागनाथ तालुक्यातील गोळेगाव, असोला, नागेशवाडी आदी ठिकाणी पाऊस झाला. जोरदार पावसानंतर काही वेळ पाऊस थांबला मात्र परत पावसाची रिमझिम सुरू झाली. ढगाळ वातावरण कायम होते. पिकांसाठी लाभदायक पाऊस असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jyotiba Temple Incident : जोतिबा डोंगरावर हायव्होल्टेज ड्रामा! बिगर सासनकाठी घेऊन आलेल्या मद्यधुंद तरुणांनी थेट पुजाऱ्यांवरच उगारला हात; पहा व्हिडिओ

Pune Accident: पुण्यातील तिघांचा अपघातात मृत्यू; एकजण गंभीर, पुणे–नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचरजवळ भीषण धडक, काय घडलं!

Latest Marathi News Live Update : आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे मच्छिमारांसाठी सवलतीच्या डिझेलवर परिणाम

महाकुंभामध्ये व्हायरल झालेली मोनालिसा भोसलेला जीवे मारण्याच्या धमक्या; व्हिडिओ शेअर करत मदतीची विनंती

LPG Cylinder Weight Reduction : गॅस संकटाचा मोठा फटका ! घरगुती LPG सिलिंडर बाबत सरकारचा नवा निर्णय

SCROLL FOR NEXT