dead
dead 
मराठवाडा

हिंगोलीत उष्माघातामुळे गुराख्याचा मृत्यू

मंगेश शेवाळकर

हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यातील गोजेगाव येथे उष्माघातामुळे एका गुराख्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून याप्रकरणी रविवारी (ता. 28) रात्री अकरा वाजता औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोजेगाव येथील संतोष कुंडलिक नागरे हे जनावरे चारण्यासाठी रविवारी (ता. २28) दुपारी गोजेगाव शिवारात गेले होते. दुपारच्या सुमारास जनावरे चारत असतांना त्यांना अचानक  थकवा जाणवत होता. त्यांना चकरा चेऊ लागल्यामुळे त्यांना तातडीने गावात आणण्यात आले. गावात पाणी पाजवून त्यांना उपचारासाठी औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संतोष नागरे (वय 35) यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. याप्रकरणी मुरली कुंडलिक नागरे यांच्या माहितीवरून औंढानागनाथ पोलीस ठाण्यामध्ये रात्री उशिरा अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान हिंगोली जिल्हयाचे तापमान मागील दहा वार्षातील उच्चांकी पातळीवर गेले आहे. रविवारी (ता. 28) जिल्ह्याचे तापमान 45 अंश सेल्सियस नोंदवले गेले आहे. नागरीकांनी उन्हामधे काम करणे टाळण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: सभेला येतो पण मराठी माणूस मनसेला मतं का देत नाही? राज ठाकरेंनी दिल उत्तर...

Pune School: स्कॉरलशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

MI Playoff Scenario : 8 सामने हरल्यानंतरही मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये जाऊ शकते का? समजून घ्या समीकरण

Latest Marathi News Live Update : काँग्रेस उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट

Sharad Pawar on Narendra Modi: नरेंद्र मोदींनी कुठं कुटुंब सांभाळलं... शरद पवारांचा पलटवार! नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT