मराठवाडा

जालना : जिल्हा बँकेकडून शंभर टक्के अनुदान वितरण

अतिवृष्टी, पीकविमा, फळबाग विम्याचे अनुदान शेतकऱ्यांना वाटप

सकाळ वृत्तसेवा

जालना : शासनाकडून प्राप्त झालेल्या अनुदानाची रक्कम द जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून शेतकऱ्यांना ९९.९३ टक्के वितरित करण्यात आली. यात अतिवृष्टी, पीकविमा, हवामान आधारित फळबाग विमा आदींच्या अनुदान रक्कमेचा समावेश आहे.

यंदा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे खरीप हंगामातील अतिवृष्टीमुळे नुकसानी पोटी शासनाकडून जिल्ह्यातील ९८७ गावांमधील तीन लाख ७३ हजार २८७ शेतकऱ्यांचे २४५ कोटी ४८ लाख रुपये जमा झाले होते. त्यापैकी जिल्हा बँकेकडून तीन लाख ४६ हजार २१० शेतकऱ्यांच्या २३२ कोटी ५९ लाखांचे अनुदान वितरित करण्यात आले आहेत.

पीकविमा कंपनीकडून अतिवृष्टीच्या नुकसानी पोटी ६३ हजार ७६१ शेतकऱ्यांचे ३५ लाख ३७ हजार रुपये जमा झाले होते. त्यापैकी जिल्हा बँकेकडून आतापर्यंत ६२ हजार २२४ शेतकऱ्यांना ३५ लाख चार हजार रुपयांचे अनुदानाची रक्कम वितरित करण्यात आली आहे. हवामान आधारित फळबाग विमा नुकसान भरपाईचे चार हजार ३७ फळबाग शेतकऱ्यांचे १२ लाख ११ हजार रुपये जिल्हा बँकेकडे जमा झाले होते. आतापर्यंत जिल्हा बँकेने चार हजार ३२६ लाभार्थी शेतकऱ्यांना १२ लाख रुपयांचे अनुदान वाटप केले आहे. त्यामुळे आतापर्यंत जिल्हा बँकेने अनुदानाची आलेली रक्कमेपैकी ९९.९३ टक्के रक्कम शेतकऱ्यांना वाटप केली आहे.

शासनाकडून तसेच विमा कंपनीकडून खरिपातील अतिवृष्टीचे आलेल्या अनुदानाची रक्कम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ६४ शाखांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वितरित करण्यात आली. आतापर्यंत ९९.९३ टक्के अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांना वितरित केली आहे. वर्ष २०२०-२१ या आर्थिक वर्षात बँकेच्या उत्कृष्ट कामकाजाबद्दल विविध पारितोषिकही मिळाली आहेत.

- आशुतोष देशमुख, कार्यकारी संचालक, द जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, जालना

बँकेच्या कारभाराबद्दल विविध पारितोषिक

जिल्हा बँकेचा कारभारात चांगली सुधारणा झाली आहे. त्यामुळे बँकाचे आणि संचालका मंडळाचा देशापातळीवरही गौरव करण्यात आला आहे. वर्ष २०२०-२१ मध्ये जिल्हा बँकेला फ्रंटियर को-ऑपरेटिव्ह बॅंक्स्‌ असोसिएशनकडून बेस्ट ईन्फ्रास्टक्चर प्लॅन या वर्गवारीत पारितोषिक चक देऊन बँकेचा गौरव करण्यात आला; तसेच बेस्ट को-ऑपरेटिव्ह बँक, बेस्ट एच आर ईनोव्हेशन बँक, बेस्ट टर्नअराऊंड बँक या श्रेणीतील मानांकित पारितोषिक ही बँकेला देऊन बँकेच्या कामकाजाचा गौरव करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT