file photo 
मराठवाडा

१०८ जणांना अटक, २२ लाखाचा मुद्देमाल जप्त- निलेश सांगडे

प्रल्हाद कांबळे

नांदेड : देशी, विदेशी, हातभट्टीसह परराज्यातील अवैध मद्य विक्री करणाऱ्या १०८ जणांना अटक केली. त्यांच्याकडून २१ लाख ८१ हजार ३६४ रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाने ता. एक मार्च ते ३१ मार्च या दरम्यान केली. तसेच ५९ बेवारस गुन्हेही दाखल करण्यात आले.
 
कोरोना या महामारीचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशासह नांदेड जिल्ह्यातही लॉकडाऊन व संचारबंदी लावण्यात आली आहे. या काळात अत्यावश्‍यक सेवेतील व्यक्तीखेरीज घरातून अन्य व्यक्तीने बाहेर न पडण्याच्या सुचना जिल्हा व पोलिस प्रशासनाने दिल्या आहेत. मात्र जिल्ह्यात अनेक ठिकाणी संचारबंदीची पायमल्ली होत आहे. अनेकावर जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. 

जिल्हाभरात अवैध धंदेवाल्यांवर कारवाई 

तर दुसरीकडे अवैध धंदेचालक आपले उखळ पांढरे करु घेत आहेत. अवैध मार्गाने देशी, विदेशी, हातभट्टी आणि सिंदी तसेच परराज्यातील मद्य काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या मंडळीनी डोके वर काढले आहे. असा अवैध धंदेवाल्यांविरुध्द कारवाई करण्यासाठी आपल्या सर्व अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्या आदेशावरुन अधीक्षक निलेश सांगडे यांनी कडक सुचना दिल्या. यावरून त्यांचे अधिनस्त अधिकारी यांनी जिल्हाभरात अशा धंदेवाल्यांवर कारवाई सुरू केली. 

२१ लाख ८१ हजार ३६४ रुपयाचा मुद्देमाल

विविध भागात छापे टाकून जवळपास १६७ प्रकरणे उघडकीस आणले. त्यात १०८ जणांना अटक केली. तर ५९ जण पसार झाले. अटक व पसार झालेल्यांच्या ताब्यातून लाखोंचा मुद्देमाल जप्त केला. यात हातभट्टी ३४९ लीटर, रसायन आठ हजार ४८० लीटर, देशी दारु ४५८ लीटर, विदेशी मद्य ४५ लीटर, ताडी तीन हजार ३०२ लीटर, काळा गुळ २१० किलोग्राम, परराज्यातील २६ लीटर, १४ दुचाकी वहाने असा २१ लाख ८१ हजार ३६४ रुपयाचा मुद्देमाल ज्यात वाहनांची किंमत सोडून १७ लाख ४१ हजार ३६४ रुपयाचा समावेश आहे. 

यांनी घेतले परिश्रम 

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक निलेश सांगडे यांच्या मार्गदर्शानाखाली निरीक्षक एस. एम. खंडेराय, भगवान मंडलवार, जवान बालाजी पवार, शेख रफीक यांच्यासह आदी अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. यापुढेही अशाच पद्धतीच्या कारावाया सुरू राहतील अशी माहिती निलेश सांगडे यांनी दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayodhya Donation Scam : चंपत राय यांचा ड्रायव्हर 'टिन्नू' आणि सुभाष करायचे रोकड पार! राम मंदिर देणगी चोरीची 'मोडस ऑपेरंडी' उघड!

Central Railway: मध्य रेल्वेची महत्त्वाची घोषणा; मिरजमार्गे धावणाऱ्या चार गाड्या तात्पुरत्या रद्द; प्रवाशांची हाेणार गैरसोय

IND VS ENG 4TH T20I: भारतीय संघ जिंकत नसेल तर...! पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यरचं मोठं विधान; म्हणाला, हे खेळाडू..

IND vs ENG 4th T20I : करावं तरी काय? भारतीय संघाचा लाजीरवाणा पराभव अन् इंग्लंडने जिंकली मालिका; गौतम गंभीर हतबल

IND vs ENG 4th T20I : भरवशाच्या म्हशीला टोणगा! भारताच्या फलंदाजांनी माती खाल्ली, श्रेयस अय्यरच्या खेळीने लाज वाचवली

SCROLL FOR NEXT