crime.jpg 
मराठवाडा

१७ वर्षीय मुलीची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : नायगाव तालुक्यातील निळेगव्हाण येथील शीतल गंगाराम जावध (वय १७) या मुलीने गुरुवारी (ता. १६) विषारी औषध पिल्याने उचारासाठी नांदेड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्याने पोलिस आय. आय. शेख यांच्या माहितीरून कुंटूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस जमादार श्री. कुमरे करीत आहेत. 

५७ हजारांची शिंदी जप्त
बिलोली तालुक्यातील सगरोळी येथील आखाड्यावर ५७ हजार रुपयांची सिंधी अवैधरीत्या चोरट्या मार्गाने विक्री करण्यासाठी उद्देशाने आढळून आला. या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक पिराजी तायवाडे यांच्या फिर्यादीवरून बिलोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक श्री. बोधने करीत आहेत. 

हरवलेल्या मुलीची शोध लागेना
हदगाव तालुक्यातील पळसा येथील प्रियंका नागनाथ दिनकर (वय १७) ही मुलगी ता. १८ मार्च पासून ती बेपत्ता आहे. या मुलीचा रंग सावळा असून बांधा सडपातळ, उंची अंदाजे पावणेपाच फूट, अंगावर कपडे जांभळ्या रंगाचा टॉप त्यावर पांढरे ठिपके व गुलाबी रंगाचा स्कार्फ ज्यावर छोट्या-छोट्या मोत्यांची डिझाइन व जिन्स कपडे आहेत. पायात लाल रंगाची सँडल असून शिक्षण बारावी उत्तीर्ण आहे. तिला मराठी भाषा बोलता येत तर केस काळे व लांब, चेहरा गोल आहे.

संपर्क करण्याचे आवाहन 
या वर्णनाची प्रियंका दिनकर या मुलीची माहिती मिळाल्यास हदगाव तालुक्यातील मनाठा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र मुंढे (मो. ८८८८१ ४१५७८) व पोलीस उपनिरीक्षक टी. वाय. चिटेवार (मो. ९९२२०१०१३३ व ९८३४६३४१४९) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मनाठा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक टी. वाय. चिट्टेवार यांनी केले आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI Transaction Charges: 2000 रुपयांपेक्षा अधिकच्या यूपीआय व्यवहारांवर 0.4 टक्के टॅक्स; 'या' ग्राहकांसाठी मात्र UPI सेवा मोफत

''तर तोंड काळं करायची वेळी आली असती'', राज ठाकरेंच्या 'त्या' टीकेला CM फडणवीसांनी दिलं प्रत्युत्तर...

IND vs AFG 2nd T20I: 'Toss' चा 'BOSS'! श्रेयस अय्यरने नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड; वरूण चक्रवर्तीला नेमकं काय झालं? BCCI म्हणते...

Pune News : पुण्याच्या चारीही दिशांना स्वतंत्र डंबर प्लांट उभारा; महापौर नागपुरे यांचे आयुक्तांना पत्र

Hingoli News : चोंडीत शक्तिपीठ महामार्गाची मोजणी रोखली! ‘जमीन गेली तर जगायचे कसे?’ वृद्ध महिला शेतकऱ्यांचा आक्रोश; तुषार जाधव यांचा पालकमंत्र्यांना थेट इशारा

SCROLL FOR NEXT