NND22KJP03.jpg 
मराठवाडा

नांदेड विभागात २२ लाख टन उसाचे गाळप

कृष्णा जोमेगावकर

नांदेड :  प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयांतर्गत नांदेड विभागात ता. २६ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या हंगामात आजपर्यंत १३ कारखान्यांनी २२ लाख ३३ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे, तर २३ लाख ५१ हजार ७९० क्विंटल साखरेचे उत्पादन झाल्याची माहिती प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयातून देण्यात आली.

विभागात तेरा साखर कारखाने सुरु
नांदेड विभागात गाळप हंगाम २०१९ - २०२० मध्ये लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड या चार जिल्ह्यांत ता. २६ नोव्हेंबर २०१९ रोजी गाळप सुरू झाले. विभागात पाच सहकारी, तर १२ खासगी, अशा १७ कारखान्यांनी राज्याच्या साखर आयुक्तांकडे गाळप परवान्यासाठी ऑनलाइन अर्ज केले होते. परंतु, त्यापैकी पाच सहकारी व आठ खासगी, अशा एकूण १३ कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे, तर परभणीमधील रेणुका शुगर व महाराष्ट्र शेतकरी हे दोन कारखाने, लातूर जिल्ह्यातील साईबाबा व टेंव्टीवन या दोन, अशा एकूण 4 खासगी कारखान्यांनी अद्याप गाळप सुरू केले नाही.

परभणी जिल्ह्यात पाच लाख टन गाळप
सुरू झालेल्या साखर कारखान्यांत परभणी जिल्ह्यातील त्रिधारा शुगर या कारखान्याने आजपर्यंत ८७ हजार १७० टन उसाचे गाळप केले आहे, तर योगेश्वरी या कारखान्याने ९६ हजार १८० टन, बळिराजा शुगर या कारखान्याने तीन लाख १४ हजार ४५ टन उसाचे गाळप केले आहे.

हिंगोली साडेसहा लाख टन गाळप
हिंगोली जिल्ह्यातील पहिले गाळप असलेल्या शिऊर या खासगी साखर कारखान्याने दोन लाख १४ हजार १०० टन उसाचे गाळप केले आहे. सहकारी कारखाना असलेल्या डोंगरकडा येथील भाऊराव चव्हाण (युनिट क्रमांक दोन) या कारखान्याने एक लाख १२ हजार ५१० टन, पूर्णा सहकारी दोन लाख १३ हजार ७९० टन, तर टोकाई या कारखान्याने एक लाख २३ हजार ७९० टन उसाचे गाळप केले आहे.

नांदेडमध्ये साडेसहा लाख टन गाळप
नांदेड जिल्ह्यातील भाऊराव चव्हाण (युनिट क्रमांक एक) दोन लाख १८ हजार ५० टन, भाऊराव चव्हाण (युनिट क्रमांक चार) एक लाख ९३ हजार ३२० टन, तर कुंटूरकर शुगर या खासगी कारखान्याने एक लाख ८४ हजार ६१० टन उसाचे गाळप केले आहे. लोहा तालुक्यातील व्यंकटेश्वरा ॲग्रो शुगर या खासगी साखर कारखान्याने ४५ हजार ९०० टन उसाचे गाळप केले आहे. 

लातूरमध्ये साडेचार लाख टन गाळप 
लातूर जिल्ह्यातील सिद्धी शुगरने एक लाख ९५ हजार ९०० टन, जागृती शुगर दोन लाख ३४ हजार ४६० टन उसाचे गाळप केले आहे.

विभागात २२ लाख ३३ हजार टन गाळप 
विभागात सर्वप्रथम ता. २६ नोव्हेंबर रोजी गाळप सुरू केलेल्या १३ कारखान्यांनी आजपर्यंत २२ लाख ३३ हजार ८२५ टन उसाचे गाळप केले आहे, तर साखरेचे उत्पादनही २३ लाख ५१ हजार ७९० क्विंटल झाले आहे. विभागाचा सरासरी साखर उतारा १०.५३ टक्के आला आहे.


‘बळिराजा शुगर’ची गाळपात आघाडी कायम
नांदेड विभागात ऊस गाळप व साखर उत्पादनात परभणी जिल्ह्यातील बळिराजा शुगर हा खासगी कारखान्याने आघाडी घेतली आहे. या कारखान्याने गाळपातील आघाडी कायम ठेवत आजपर्यंत तीन लाख १४ हजार ४५ टन उसाचे गाळप केले आहे, तर साखरेचे उत्पादनही तीन लाख ३४ हजार सहाशे क्विंटल झाले आहे.

नांदेड विभागातील आजपर्यंतचे गाळप व साखर उत्पादन
(गाळप टनमध्ये, साखर उत्पादन क्विंटलमध्ये)
जिल्हा............ऊस गाळप.........साखर उत्पादन
परभणी..........४, ९७, ३९५........५, २१, १९०
हिंगोली..........६, ६४, १९०........७, १४, १००
नांदेड............६, ४१, ८८०........६, ७०, ८५०
लातूर............४, ३०, ३६०........४, ४५, ६५०
एकूण..........२२, ३३, ८२५......२३, ५१, ७९०
विभागाचा सरासरी साखर उतारा १०.५३ टक्के
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut : कर्जाच्या पैशातून मोदींचा केक कापणार? वाढदिवस साजरा करणे म्हणजे आर्थिक गुन्हा, संजय राऊतांचे राज्य सरकारवर ताशेरे

Latest Marathi News Updates : कांद्याचे दर घसरले, शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन

जरा आवरा अन् Google Gemini ला स्वत:चे पर्सनल फोटो देण्यापूर्वी ही बातमी वाचा... नाहीतर वेळ निघून जाईल, तज्ज्ञांचा इशारा

कलाकार हवा तर असा ! दशावतारचं यश पाहून हिंदी मीडियाने केलं दिलीप प्रभावळकरांचं कौतुक "बॉलीवूडला लाज वाटायला.."

Rahuri Accident: 'दुचाकींच्या अपघातात एक ठार, एक जखमी'; दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर भीषण धडक

SCROLL FOR NEXT