file photo 
मराठवाडा

जिंतूर तालुक्यातील चांदज येथे २६ कोरोनाबाधित रुग्ण आढळले; ग्रामस्थांमध्ये चींता, प्रशासन अलर्ट

राजाभाऊ नगरकर

जिंतूर (जिल्हा परभणी ) : दीड हजाराच्या आत लोकसंख्या असलेल्या तालुक्यातील चांदज या खेड्यात एकाच दिवशी २६ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे गावात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात तालुक्यात कोरोना बाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्यावतीने खबरदारीचे उपाय म्हणून ग्रामीण भागात कोरोना चाचणीची गती वाढविण्यात आली असून चांदज गावात स्थानिक आरोग्य विभागातर्फे १०० जणांच्या आरटीपीसीआर चाचण्या घेण्यात आल्या होत्या. शनिवारी (ता. २०) या चाचण्यांचा अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाला. त्यात १०० पैकी तब्बल २६ जणांचे अहवाल पाॅझेटिव्ह आले.यामध्ये चौदा ते साठ वयोगटातील अठरा पुरुष आणि २१ ते ५५ वयोगटातील आठ महिलांचा समावेश आहे.

एका खेडेगावात एकाचवेळी मोठ्या प्रमाणावर बाधित रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभागासह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. खबरदारीचे उपाय म्हणून आरोग्य विभागातर्फे उर्वरित सर्वच ग्रामस्थांची चाचणी घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.दिनेश बोराळकर यांनी दिली आहे. 

प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित

सुमारे एक हजार ४०० लोकसंख्या असलेल्या चांदज गावात एकाचवेळी तब्बल २६ जण कोरोनाबधित रुग्ण आढळून आल्याने तहसीलदार सखाराम मांडवगडे यांनी गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करुन मंडळाधिकारी, तलाठी, गटविकास अधिकारी यांना तसे आदेशीत केले. या आदेशावरुन
गाव सील करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.

निर्जंतुकीकरणही केले आहेत :

गावात कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी आरोग्य आणि महसूल विभागाच्या वतीने खबरदारीचे उपाय म्हणून सरपंच यांच्या मदतीने संपूर्ण गांवाचे युध्द पातळीवर निर्जंतुकीकरण करण्यात आले.
 

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT