पाथरी रोडला खड्डे  
मराठवाडा

पाथरीपासून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाला 387 ठिगळं; गुणवत्ता तपासण्याची गरज

पाथरी शहरातून कल्याण- निर्मल हा 61 क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग जातो दीड वर्षांपूर्वी हा रस्ता वाहतुकीस सुरु झाला आहे.

धनंजय देशपांडे

पाथरी : कल्याण- निर्मल राष्ट्रीय महामार्गाला तीस किलोमीटर अंतरात तब्बल 387 मोठमोठे ठिगळं दिसत आहेत. रस्ता खचत असल्याने अनेक ठिकाणी रस्त्याला प्याचेस देण्यात आली आहेत. ही प्याचेस एक समान नसल्याने महामार्गावर सुसाट असलेली वाहने आदळत आहेत. दिडच वर्षात महामार्ग खचल्या जात असल्याने महामार्गाच्या गुणवत्तेवर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.

पाथरी शहरातून कल्याण- निर्मल हा 61 क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग जातो दीड वर्षांपूर्वी हा रस्ता वाहतुकीस सुरु झाला आहे. मुंबई, पुणे, अहमदनगर, परभणी, नांदेड या महत्वाच्या शहराला जोडणाऱ्या या महामार्गावरुन मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरु आहे. रस्त्याचे काम पूर्ण होऊन दीड वर्ष होत नाही तोच हा रस्ता ठिकठिकाणी खचला गेला आहे.

हेही वाचा - पाथरड पूलाच्या पडझडीची परंपरा कायम; नविन पूलाला मुहूर्त कधी ?

ज्याठिकाणी रस्ता खचला जात आहे त्या ठिकाणी रस्त्यावर कार्पेट टाकून रस्ता उचलण्याचा प्रयत्न केला गेला आहे. दीड ते दोन इंची कार्पेटच्या प्याचेस मुळे एक समान रस्ता राहिला नाही. त्यामुळे वाहने आदळत आहेत. पाथरी ते माजलगाव या तीस किलोमीटरपर्यंत जवळपास 387 प्याचेस आहेत. दहा- पंधरा तर काही ठिकाणी पन्नास फुटाचे प्याचेस ही या महामार्गावर असल्याने या महामार्गाची गुणवत्ता तपासण्याची आवश्यकता आहे.

महामार्ग अनेक ठिकाणी खचत जाऊन रस्त्यावर छोटे छोटे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या खड्यात पावसाचे पाणी साचत आहे. दीड वर्षातच या रस्त्याची अक्षरशः वाट लागली आहे. पाच वर्षे रस्त्याच्या दुरुस्तीची जबाबदारी संबंधित ठेकेदार यांच्याकडे असली तरी एकाच वर्षात रस्ता खचला जातो या वरुन रस्त्याच्या दर्जा विषयी शंका निर्माण होत आहे.

येथे क्लिक करा - राष्ट्रवादी भवानत गटबाजीचे प्रदर्शन; पक्षीय फलकावरून वादावादी

केंद्र सरकार कडून तयार होणाऱ्या महामार्गावर करोडो रुपये खर्च केले जात आहेत. एकीकडे केंद्र सरकार देशभरात महामार्गाचे जाळे विणल्याची जाहिरात करत असतांना मात्र त्यांनी या रस्त्याच्या गुणवत्तेकडे लक्ष दिले नाही.

- रवींद्र धर्मे, शिवसेना, उपजिल्हाप्रमुख, परभणी.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis : पुणे जिल्ह्यात नराधमाचा अमानुषपणा! चिमुरडीच्या हत्येनंतर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; आरोपीला मिळणार मृत्यूदंडाची शिक्षा?

Latest Marathi News Live Update : 12 वी च्या निकालात, बुलढाणा जिल्हाचा निकाल 95.22 % टक्के

Hasan Mushrif Statement : “गोकुळचा निकाल लागेल त्या दिवशी गुलाल लावूनच प्रतिक्रिया,” हसन मुश्रीफांनी शिवाजी पाटलांना थेट डिवचलं

Mumbai: पुनर्वसन ४० वर्षे रखडले; उच्च न्यायालयाचे केंद्र, ‘जेएनपीए’ला खडे बोल

Shahuwadi crime : कोल्हापुरातील मलकापूरमध्ये धक्कादायक घटना; सख्या भावानेच केला भावाचा खून, भाऊ फरार

SCROLL FOR NEXT