corona corona
मराठवाडा

कौतुकास्पद! लोहारा तालुक्यातील ४३ गावांनी कोरोनाला हरविले

सध्या शहरासह जेवळी, आष्टा कासार, कानेगाव, रेबेचिंचोली या पाच गावांतील एकूण १३ कोरोना बाधित रूग्ण उपचाराखाली आहेत

निळकंठ कांबळे

सध्या शहरासह जेवळी, आष्टा कासार, कानेगाव, रेबेचिंचोली या पाच गावांतील एकूण १३ कोरोना बाधित रूग्ण उपचाराखाली आहेत

लोहारा (उस्मानाबाद): तालुका आरोग्य यंत्रणेने घेतलेले परिश्रम आणि त्याला नागरिकांनी दिलेली साथ यामुळे लोहारा तालुक्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरू लागली आहे. परिणामी, आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. यातून काही अंशी नागरिकांना दिलासा मिळाला आहे. सध्या शहरासह जेवळी, आष्टा कासार, कानेगाव, रेबेचिंचोली या पाच गावांतील एकूण १३ कोरोना बाधित रूग्ण उपचाराखाली आहेत. आजवर तालुक्यातील ४३ गावांनी कोरोनाला हद्दपार केले आहे.

मागील दीड वर्षांपासून कोरोना संसर्गाने लोहारा तालुक्याला घेरले आहे. गतवर्षी जिल्ह्यातील पहिला रूग्ण तालुक्यातील धानुरी येथे आढळून आला होता. त्यामुळे आरोग्य विभागाने तालुक्यावर अधिक फोकस करत प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला नाही. मात्र, कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने उग्र रूप धारण केले. मार्च ते जून या तीन महिन्यात बाधित रूग्ण संख्येत मोठी वाढ झाली. त्यामुळे शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह आणि औद्योगिक प्रशिक्षण केंद्र या दोन ठिकाणी कोविड केअर सेंटर उभारण्यात आले होते. परंतु, रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने दोनही कोविड सेंटर अपुरे पडू लागले. त्यातच धानुरी, जेवळी, आष्टाकासार, माकणी, कानेगाव, सास्तूर, वडगाव, हिप्परगा (रवा) ही गावे कोरोना हॉटस्पॉट ठरली. या गावांत प्रत्येकी २०० पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले.

बाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन आरोग्य विभागाने सेवाभावी संस्थांच्या मदतीने ग्रामीण भागात ठिकठिकाणी विलगीकरण कक्ष स्थापन करून रुग्णांवर उपचार सुरू केले. तालुक्यात कोरोना संसर्ग वाढू नये, यासाठी ज्या गावांत बाधितांची संख्या अधिक आहे. अशा गावांच्या सीमा सील करून नागरिकांच्या कोविड तपासण्या करण्यात आल्या. बाधित रूग्ण सापडताच त्याला तत्काळ विलगीकरण कक्षात दाखल करून उपचार केले. तसेच कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण केल्याने मागील महिन्याभरापासून तालुक्यातील बाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने कमी झाली आहे.

१३ रूग्ण उपचाराखाली-

सध्या शहरातील दोन रूग्ण, जेवळीमध्ये चार, रेबेचिंचोलीमध्ये तीन आष्टाकासारमध्ये दोन तर कानेगाव, हिप्परगा (रवा) येथे प्रत्येकी एक असे तालुक्यात एकूण केवळ १३ रूग्ण उपचाराखाली आहेत. आतापर्यंत तालुक्यात तीन हजार ८९८ बाधित रूग्ण आढळून आले आहेत. यातील तीन हजार ८१९ रूग्ण बरे झाले. तर जवळपास ७० जणांचा बळी गेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Latest Maharashtra News Updates : आम्ही एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT