dharashiv sakal
मराठवाडा

Dharashiv News : अतिशोषित पाणलोट क्षेत्रात धाराशिव जिल्ह्यातील ५५ गावांचा समावेश

भूजल संकटाच्या उंबरठ्यावर; अटल भूजल योजनेतून उपाय सुरू,तरी जलसंकटांची शक्यता

सकाळ वृत्तसेवा

धाराशिव : जिल्ह्यातील ५५ गावांची भूजलपातळी खालावल्याने ही गावे जलसंकटाच्या उंबरठ्यावर आहेत. अतिशोषित पाणलोट क्षेत्रातील ही गावे आहे. जागतिक बँक आणि केंद्र शासनाच्या अटल भूजल योजनेत ही गावे समाविष्ट करण्यात आली आहेत. जलसुरक्षा आराखडा अर्थात पाण्याच्या ताळेबंद तयार करून त्यावर उपाय योजना करण्यात येत आहेत. तरीही आगामी उन्हाळ्यात या गावांतून जलसंकट उद््‍भवण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

भूगर्भजल शास्त्रज्ञांनी केलेल्या सर्व्हेक्षणातून या गावातून पाण्याची हेक्टरी २४ कोटी लिटर इतकी तूट असल्याचे निष्पन्न झाले होते. नाले, विहिरी, कुपनलिका यांच्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. योजनेतून बांधबंदिस्ती, बंधारे, पुनर्भरण आदी लोकसहभागांच्या कामातून यावर उपाययोजना करण्यात येत आहेत. पाणी उपसा आणि वापर याबाबाबत लोकांतून जनजागृती करण्यात येत आहे.

२०२०पासून ही योजना कार्यान्वित झाली आहे. कोविड काळातील दोन वर्षे वगळून शेतकरी आणि महिलांमधून पाणी उपसा आणि वापर यावर विविध कार्यक्रमातून जनजागृती करण्यात येत आहे. शासन याबाबत योजना राबवित असले तरी, यात लोकसहभाग असल्याशिवाय त्यातून निष्पत्ती होणार नाही. यामुळे पिकांना पाणी देण्यासाठी ठिबक, तुषार आणि मल्चिंग पद्धतीनेच त्यांनी पाण्याचा वापर करावा हे सांगण्यात येत आहे. भरमसाठ पाणी लागणाऱ्या उसासारख्या पिकांऐवजी अन्य पीक घेण्यास सांगितले जात आहे. यात शेतकऱ्यांसह महिलांना पनिवापराची जाणीव करून देण्यात येत आहे.

अतिशोषित जिल्ह्यातील गावे

बुकनवाडी, दुधागाव, गोपाळवाडी, गोरेवाडी, गोवर्धनवाडी, थोडसरवाडी, कावळेवाडी, कोलेगाव, कसबेतडवळे, तेर, आळणी, बावी (ढोकी), भडाचीवाडी, जवळे दु., खामगाव, खेड, किणी, कुमाळवाडी, मुळेवादी, तुगाव, येडशी, येवती, सुम्भा, टाकळीढोकी, भंडारवाडी, मोहतरवाडी, पानवाडी, भिकारसारोळा, पळसप, घोगरेवाडी, अरणी, जागजी, पाडोळी, टाकळीबेंबळी, बरमगाव बु., बावी, बेंबळी, धारूर, धुत्ता, कनगरा, केशेगाव, खामसवाडी, महादेववाडी, विठ्ठलवाडी, महाळंगी, पंचगव्हान, उमरेगव्हान, बामणी, बामणीवाडी, ताकविकि (सर्व ता. धाराशिव), भगतवाडी, चरेवाडी, कोळेवाडी, नाईचाकूर, सावळसूर (सर्व ता.उमरगा)

या पाणलोट क्षेत्रात जमिनीतील खोलवरून पाणी उपसा आणि बेफाम पाणीवापर यामुळे ही गावे अतिशोषित पाणलोट क्षेत्रात आली आहेत. यावर उपाय म्हणून, शेतकऱ्यांसह गृहिणी महिला यांना पाण्याचे नियोजन आणि काटकसरीने पाणी वापरण्यास प्रवृत्त करण्यात येत आहे. बांधबंदिस्ती, पुनर्भरण, पाण्याचा काटकसरीने वापर, शेतीचे क्षेत्र जास्तीतजास्त ठिबक व्हावे. याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. यावर भर देण्यात येत आहे.

मेघा शिंदे, भूगर्भजल शास्त्रज्ञ, धाराशिव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर काका पुतण्या सोबत! दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार, अजित पवार यांनीच केली घोषणा

Akola Municipal Election 2025 : संपर्क झाला, पण प्रतिसाद नाही; अकोल्यात काँग्रेस-वंचित समीकरण का अडलं?

सुरुंगाच्या स्‍फोटाने कातरखटाव हादरले; बाजार सुरू असतानाच धमाक्याने पळापळी, दोघे जखमी, घरांवर दगडी अन्..

Railway : पुणे-मनमाड लोहमार्ग होणार ‘भार’दस्त; नवीन रूळ तब्बल ५५ कोटी टन वजनाचा भार वाहणार

Murlidhar Mohol : पुण्यावर मोदी-फडणवीसांचे व्यक्तिगत लक्ष; पन्नास हजार कोटींच्या विकासकामांना गती

SCROLL FOR NEXT