blood donation blood donation
मराठवाडा

राष्ट्रवादीच्या रक्तदान शिबिरात ५७ रक्तदात्यांनी केले रक्तदान

शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांच्या हस्ते झाले

अविनाश काळे

उमरगा (उस्मानाबाद): राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते शरदचंद्र पवार व प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या आवाहनानुसार कोरोना काळात देशात झालेला रक्त तुटवडा भरून काढण्यासाठी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने  सोमवारी (ता. तीन) श्रीराम मंगल कार्यालयात आयोजित रक्तदान शिबीरात ५७ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांच्या हस्ते झाले. रक्तदान शिबिराच्या नियोजनात अण्णाभाऊ साठे क्रांती बहुउद्देशीय सामाजिक संस्था ब्रह्मपुरी, विश्व मराठा संघाचे जिल्हा संपर्कप्रमुख बाबा पवार व त्यांचे सहकारी यांचेही योगदान लाभले. दरम्यान कोरोना महामारीच्या काळात व कोविड प्रतिबंधात्मक लस घेतल्यानंतर अनेकांना रक्तदान करता येणार नाही. याची जाणीव ठेवून लस घेण्यापूर्वी प्रत्येकाने रक्तदान करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. बिराजदार यांनी यावेळी केले.

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संजय पवार, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष शमशोद्दीन जमादार, राष्ट्रवादी युवक जिल्हा उपाध्यक्ष मोहन जाधव, शहराध्यक्ष खाजा मुजावर (उमरगा), प्रा. दत्ता इंगळे (मुरूम), ग्रंथालय विभागाचे जगदीश सुरवसे, अभिजीत माडीवाले, अॅड. माळी, विष्णू भगत, रणजीत गायकवाड, बाळासाहेब बुंदगे, कुमार थिटे, व्यंकटेश खंडागळे, अजित पाटील, बाबा कुरेशी, भरत देडे, पिंटू कलशेट्टी, विकास गायकवाड, राहुल थोरात, रमेश बिराजदार, अमोल बिराजदार, किसन कांबळे, विश्व मराठा संघाचे शहर प्रमुख मंगेश भोसले, श्याम जोजन, रणजीत बिराजदार, आकाश राठोड, सुरज भोसले, राहुल मातोळे, दयानंद चव्हाण, प्रवीण माळी, प्रदीप चिंतामणी, विशाल मुगळे, आकाश अंधारे, नितीन नागरे, भीमाशंकर टिकांबरे आदींची उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FOREIGN JOB OPPORTUNITIES: या राशींच्या लोकांना मिळू शकते परदेशात जाण्याची संधी; करिअर आणि पैशांसाठी ठरू शकतो मोठा टर्निंग पॉइंट

Jintur Agitation : जिंतूरात बंजारा आंदोलनाला हिंसक वळण; उपोषणकर्ते विनोद आडे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड, रास्ता रोकोने शहरात खळबळ

Water Scarcity : अंबड तालुक्यात पाणी टंचाईचे सावट: लघु,पाझर तलाव कोरडेठाक तर विहिरी, कूपनलिका ची पाणी पातळी चालली खालावत

CSK Head Coach: जहीर खानकडे चेन्नई सुपर किंग्सची धुरा! IPL 2027 साठी माजी भारतीय स्टारची हेड कोचपदी नियुक्ती, CSKचा मोठा निर्णय

Marathi News Live Updates: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, ५ दिवस पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT