file photo
file photo 
मराठवाडा

हिंगोली जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बँकेतील ६०० कर्मचारी संपावर

राजेश दारव्हेकर

हिंगोली : जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखेतील अधिकारी, कर्मचारी खाजगिकरणाच्या विरोधात रणशिंग फुंकले असून सोमवारी (ता. १५) शाखेसमोर जोरदार निदर्शने करीत सहाशे पेक्षा अधिकारी, कर्मचारी संपावर गेल्याने बॅंकेचे कामकाज ठप्प पडले असून खातेदारांची देखील गैरसोय झाली आहे.

जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बँकेच्या पन्नासच्यावर शाखा असून जवळपास सहाशेपेक्षा अधिक अधिकारी, कर्मचारी संख्या आहे. यामध्ये बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी, आयसीआयसीआय, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ बडोदा, सिंडिकेट बँक, युनियन बँक, कॅनरा बँक अशा एकूण दहा ते पंधरा राष्ट्रीयकृत बँका असून त्यांच्या शाखा देखील जिल्हाभरात आहेत. शनिवारी, रविवारी आठवडी सुट्टी असल्याने बँका बंद होत्या. तर सोमवारी, मंगळवारी बँक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केंद्र शासनाच्या खाजगीकरणाला तीव्र विरोध करीत देशभरात बँक युनियनने संप पुकारला आहे. 

मागील अनेक वर्षापासून केंद्र शासन राष्ट्रीकृत बँकांचा समावेश खाजगीकरणात केला जात असल्याने बँक कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे. या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यासाठी कर्मचाऱ्यांनी संपात सक्रिय सहभाग घेत बँका बंद ठेवल्याने ग्राहकांची गैरसोय होणार आहे. मागील वर्षांपासून बँक संघटनेचे कर्मचारी खाजगीकरण नको म्हणून विरोध दर्शवित आहेत. आंदोलने देखील केली असताना केंद्र सरकार मात्र आपल्या निर्णयावर ठाम असून बँक संघटना त्याला आक्रमक भूमिका घेऊन विरोध करीत आहे. यात मात्र नाहक ग्राहक, शेतकरी भरडला जात आहे. आधीच मार्च एन्ड असल्यामुळे व्यापारी वर्गाचे, अडत दुकानदारांची महत्वाची कामे असतात, याशिवाय शासनाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन, सेवानिवृत्ती धारकांची कामे या संपामुळे खोळंबली जात आहेत.

बँक ऑफ इंडिया गंगानगर व मुख्य शाखेत सोमवारी कर्मचाऱ्यांनी केंद्र शासनाच्या खाजगीकरण धोरणाचा निषेध करीत निदर्शने केली. यावेळी घोषणा ही देण्यात आल्या. यावेळी आशिष बडवने, संजय सातव, अमोल वाघिले, हर्षद राऊत, विजय अग्रवाल, अनिल दहातोंडे, नितीन माने आदींचा समावेश होता. तर वसमत येथे युनियन बँक ऑफ इंडियाचे रवी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली निदर्शने करण्यात आली. सहाशेपेक्षा अधिक कर्मचारी दोन दिवसीय बँक संपात सहभागी झाले आहेत.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 Updates: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 60.74 तर महाराष्ट्रात 53.90 टक्के मतदान

Explained: EVM जाळल्यावर, तोडफोड केल्यावर शिक्षा काय? निवडणूक आयोगाचे कडक कायदे जाणून घ्या...

ECI Directs X : भाजपची 'ती' आक्षेपार्ह पोस्ट तातडीनं हटवा! निवडणूक आयोगाचे ट्विटरला आदेश

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गोळीबार करत हल्लेखोर पैसे घेऊन पसार

Suryakumar Yadav Video: प्रेम हे! शतक करत मुंबईला जिंकवल्यानंतर सूर्याचा मैदानातून स्टँडमध्ये बसलेल्या पत्नीला व्हिडिओ कॉल

SCROLL FOR NEXT