badnapur badnapur
मराठवाडा

दुर्दैवी! आजोळी आलेल्या श्रावणीचा पावसाने अंगावर भिंत पडल्याने मृत्यू

मंगळवारी मध्यरात्री भिज पावसाचा जोर वाढल्याने घराची भिंत कोसळून श्रावणीचा दुर्दैवी मृत्यू झाला

आनंद इंदानी

बदनापूर (जालना): सततच्या भिज पावसाने घराची भिंत कोसळून आठ वर्षीय चिमुकल्या नातीचा मृत्यू झाला आहे. तर तिचे आजी-आजोबा गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्दैवी घटना तालुक्यातील ढासला येथे बुधवारी ( ता. 14) पहाटेच्या सुमारास घडली. श्रावणी मदन सांगोळे असे मृत चिमुकलीचे नाव आहे. ती वडीकारळा येथील रहिवाशी असून मागील चार महिन्यांपासून ती आपल्या आजोळी म्हणजे ढासला येथे आजी-आजोबांकडे आली होती.

दरम्यान, मंगळवारी मध्यरात्री भिज पावसाचा जोर वाढल्याने घराची भिंत कोसळून श्रावणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर तिची आजी शांताबाई सारंगधर सोनोने (वय 60) आणि आजोबा सारंगधर विषवनाथ सोनोने (वय 65 दोघे रा. ढासला) असे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच गावातील अशोक नाईक, राजू सोनोने, शिवाजी सोनोने यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तातडीने बदनापूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. आजी शांताबाई यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

ढासला गाव सखल भागात असल्याने येथे जोरदार पावसामुळे गावाला वेढा पडण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे या गावातील लोकांना पक्के घरे बांधून देण्याचे आश्वासन तत्कालीन पालकमंत्री, आमदार जिल्हाधिकारी व तहसीलदारांनी ग्रामस्थांना दिले होते. मात्र पाच वर्षे उलटून देखील या संदर्भात कुठलीच कार्यवाही न झाल्याने ही दुर्दैवी घटना घडली असून या घटनेला प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nationwide Workers Strike : देशभरातील तब्बल ३० कोटी कामगार जाणार संपावर! ; ६०० जिल्ह्यांमधील कामं ठप्प होण्याची चिन्हं

Pune News : कोल्हापूरच्या आदेशाने पुण्यातील निवडणूक बिनविरोध

Shendurwada News : शेंदूरवादा गटात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मुसंडी

Daund ZP Election Result : दौंड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ७ पैकी ६ जागा जिंकत आपले वर्चस्व कायम राखले

Pune Crime : फसवणुकीच्या गुन्‍ह्यात पसार झालेल्या पोलिस हवालदारास आंध्रप्रदेशातून अटक

SCROLL FOR NEXT