file photo
file photo 
मराठवाडा

परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या २१ जागांसाठी ८५ अर्ज वैध

गणेश पांडे

परभणी ः जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाच्या २१ जागांठी ८५ उमेदवारी अर्ज वैध ठरले तर १६ उमेदवारी अर्ज विविध कारणांनी अवैध ठरले. अपेक्षेप्रमाणे अनुक्रमे पाथरी व जिंतुर विविध कार्यकारी सेवा सहकारी व धान्यकोष मतदार संघासाठी आमदार बाबाजानी दुर्राणी व माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांनी बिनविरोध निवड होणार असल्याचे स्पष्ट झाले.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूकीत १०१ उमेदवारांनी १५४ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी ८५ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले तर १६ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश सुरवसे यांनी दिली.

परभणी विविध कार्यकारी सेवा सहकारी व धान्य अधिकोष मतदारसंघ परभणीतून सुरेश वरपुडकर, समशेर वरपुडकर, दत्ता गोंधळकर, जिंतूरमधून रामप्रसाद बोर्डीकर, सेलूतून मेघना बोर्डीकर, वर्षा लहाने, पाथरीतून बाबाजानी दुर्राणी, मानवतमधून पंडीतराव चोखट, आकाश चोखट, गंगाधरराव कदम, सोनपेठातून गंगाधर कदम, श्रीकांत भोसले, राजेश विटेकर, गंगाखेडातून यशश्री सानप, भगवान सापन, सुभाष ठवरे, पालममधून गणेशराव रोकडे, नारायण शिंदे, लक्ष्मण दुधाटे, तुषार दुथाटे, पूर्णेतून पांडूरंग डाखोरे, बालासाहेब देसाई, अरुण गुंडाळे, हिंगोलीतून तानाजी मुटकुले, दत्तराव जाधव, गुलाब सरकटे, सेनगावातून रुपाली राजेश पाटील, राजेंद्र देशमुख, औंढा येथून शेषराव कदम, राजेश साहेबराव पाटील, गयाबाराव नाईक, मनिष आखरे, वसमतमधून अंबादास भोसले, दत्तराव काळे, सविता सुनिल नादरे, खोबराजी नरवाडे, चंद्रकांत नवघरे, कळमनुरीतून सुरेश वडगावकर, यशोदाबाई चव्हाण, शिवाजी ग्यानोबाराव माने यांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले.

शेतमाल प्रक्रिया मतदारसंघातून भावना रामप्रसाद कदम, सुरेश देशमुख, बालासाहेब निरस, सुशीलकुमार देशमुख यांचे तर इतर शेती संस्था मतदार संघातून विजय जामकर, समशेर वरपुडकर, शशिकांत वडकुते, चंद्रकांत चौधरी, भगवान वटाणे, आनंद भरोसे, सोपान करंडे, ज्ञानेश्वर् जाधव, बालाजी त्रिमल्ले यांचे अर्ज वैध ठरले. महिला प्रतिनिधी मतदार संघातून विद्या कालीदास चौधरी, संजीवनी वटाणे, यशश्री सानप, रुपाली पाटील, अंजली रविंद्र देशमुख, प्रेरणा समशेर वरपुडकर, करूणा बालासाहेब कुंडगिर, भावना रामप्रसाद कदम, वेणूबाई आहेर यांचे, अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती मतदार संघातून शिवाजी मव्हाळे, प्रशास ठाकूर, व्दारकाबाई कांबळे, डॉ. सिध्दार्थ भालेराव, डॉ. प्रतिभा भालेराव, अतुल सरोदे, गौतम मोगले, सुशील मानखेडकर यांचे विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग मतदार संघातून दत्तात्रय मायंदळे, भगवान वटाणे, पकंजकुमार राठोड, भगवान सानप, सुमीत परिहार, सौराजसिंह परिहार, सुरेश गिरी, करुणाबाई कुंडगीर, नारायण पिसाळ यांचे तर इतर मागास प्रवर्गातून अंजली रविंद्र देशमुख, भगवान वाघमारे, प्रल्हाद चिंचाणे, प्रशांत कापसे, व मनिष आखरे यांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत.

१६ उमेदवारी अर्ज अवैध

विविध कार्यकारी सेवा विकास व धान्यकोष मतदार संघातून रुक्मीनबाई सानप, प्रल्हाद मुरकुटे, विशाल विजयकुमार कदम, संजय राठोड, बाबाराव राखोंडे, बालाजी कावळे, सत्यभामा देसाई, त्रिंबकेश्वर मुळे, इतर शेती संस्थातून भगवान वाघमारे, मिनाताई देशमुख, व्यंकट राखे यांचे अर्ज अवैध ठरले. यापैकी काहींचे दुसरे अर्ज मात्र वैध ठरले आहेत.

संपादन - राजन मंगरुळकर
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ponzi Scam: 100 कोटी रुपयांच्या पॉन्झी घोटाळ्याप्रकरणी ईडीचे पुणे, नाशिक अन् कोल्हापुरात छापे! काय आहे प्रकरण?

Ind vs Sa Series : भारत-दक्षिण आफ्रिका खेळणार ODI-कसोटी अन् टी-20 मालिका, 'या' महिन्यात रंगणार थरार

Success Mantra: तुमच्या 'या' सवयींमुळे खराब होऊ शकते करिअर, आजच करा बंद

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

Latest Marathi News Live Update : संभाजीनगरमध्ये सिलिंडर स्फोट, बालिका ठार, पाच जखमी

SCROLL FOR NEXT