file photo 
मराठवाडा

९२ लाखाची फसवणुक, अटकपूर्व जामीन फेटाळला.

प्रल्हाद कांबळे

नांदेड : मुदखेड येथील दुय्यम निबंधक कार्यालयात १५९ ई- चलनाचे बनावट दस्तावेज तयार करुन शासनाची ९४ लाख २२ हजार ९० रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी एकाचा जिल्हा न्यायाधिश (दुसरे) के. एन. गौत्तम यांनी आरोपीचा अटकपूर्व जामीन नाकारला. मुदखेड पोलिसांत दोघांविरुध्द फसवणुकीसह आदी कलमान्वये गुन्हा दाखल आहे.

मुदखेड येथील दुय्यम निबंधक कार्यालयात ता. २४ एप्रील २०१७ ते ता. १९ जानेवारी २०१९ या काळात पांडुरंग व्यंकट कुलकर्णी व रोहितसिंह बिसेन दोघेही रा. बिसेनगनर व्हीआयपी रोड, नांदेड या दोघांनी संगनमत करुन १५९ ई- चलन दस्ताऐवजामध्ये चलन हे बनावट करुन स्वत: च्या आर्थीक फायद्यासाठी चलन न वापरता दुसराच बनावट पर्याय उपलब्ध करुन बनावट कागदपत्रे तयार केली. यामध्ये शासनाचा ९४ लाख २२ हजार ९० रुपयांचा महसुल बुडवून शासनाची फसवणुक केली. याप्रकरणी प्रभारी दुय्यम निबंधक शरद काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मुदखेड पोलिसांनी दोघांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

एकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला तर दुसऱ्याची सुनावणी पुढे ढकलली

तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्‍वांभर पल्लेवाड फौजदार नारायण शिंदे करीत आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर रोहीतसिंह सुरेशसिंह बिसेन याने नांदेडच्या जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज क्रमांक ३७/ २०२० आणि पांडूरंग व्यंकट कुलकर्णी याने अर्ज क्रमांक ३८/ २०२० दाखल केला. न्यायालयात पोलिसांनी दाखल केलेल्या ‘से’ पोलिसांचे म्हणणे आहे की, कंत्राटी पध्दतीवर काम करणाऱ्या संगणक चालकांनी स्वत: चा आर्थीक फायदा करुन शासनाला ९४ लाख २२ हजार ९० रुपयाचा महसुल बुडविला. ही रक्कम त्यांच्याकडून जप्त करायची आहे. ई- चालन विरुपीत करुन त्यात रोख पैसे दिले असे दाखवतांना यात कोणी इतर काही व्यक्तींचा सहभाग आहे का याची माहिती घ्यावयाची आहे.

खोट्या ई-चलनाद्वारे १५९ रजीस्ट्री 

खोट्या ईच चलनाद्वारे जवळपास दीडशेहून अधिक रजीस्ट्री करून दिल्या आहेत. या सर्व कारणासाठी माहिती घ्यावयाची आहे. त्यामुळे त्यांना अटकपूर्व जामीन देऊ नये. असा युक्तीवाद ॲड. रणजीत देशमुख यांनी न्यायालयासोर मांडला. यावरून न्यायाधीश गौत्तम यांनी या पांडूरंग कुलकर्णी याचा जामीन अर्ज फेटाळला. तर रोहितसिंग बिसेन याच्या अर्जावर बुधवारी (ता.२२) सुनावणी होणार आहे. हे प्रकरण गंभीर असून मुदखेड पोलिसांनी योग्यरित्या तपास केला तर अजून काही बडे मासे यात अडकण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे पोलिसांनी सांगितले.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam: तलाठी अन् गट 'क' पदांसाठी घेतली जाणारी परीक्षा आता थेट पुढच्या वर्षी! जाणून घ्या नवी तारीख

8th pay commission : १२ लाख कर्मचाऱ्यांना होणार मोठा फायदा ! १८ हजार रुपये बोनससह महागाई भत्ता अन् बरंच काही...

Gold Rate Today: सणाआधी सोन्याच्या भावात मोठा बदल! खरेदीआधी पाहा तुमच्या शहरातील 10 ग्रॅमचा ताजा भाव

Marathi News Live Updates : ओबीसी आंदोलकाच्या गाडीवर भररस्त्यात दगडफेक; हल्ल्याचा थरारक प्रकार कॅमेऱ्यात कैद

Success Story: जिल्हाधिकारी होण्याचं बालपणीचं स्वप्न... अपयश आलं, नोकरी सोडली, पण जिद्द सोडली नाही; ऐश्वर्यम UPSCत देशात १०वी

SCROLL FOR NEXT