जबरी चोरीच्या घटना
जबरी चोरीच्या घटना 
मराठवाडा

सासूच्या आत्महत्याप्रकरणी डॉक्टर जावयासह चौघांवर गुन्हा, परळीतील घटना

प्रवीण फुटके

पुढील तपास सहायक निरीक्षक जी.बी.पालवे करत आहेत.

परळी वैजनाथ (बीड) : शहरातील विद्यानगर भागातील महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तीन आठवड्यापूर्वी उघडकीस आली होती. जावई आणि त्याच्या कुटुंबियांकडून झालेला अपमान जिव्हारी लागल्यानेच आईने आत्महत्या केल्याचा आरोप मुलीने केली. या प्रकरणी डॉक्टर जावयासह चौघांवर शनिवारी (ता.१५) शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला. (A case has been registered against four persons in connection with the suicide of mother-in-law at Parli Vaijnath)

शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील विद्यानगर भागातील रहिवासी नमिता अमोल रकटे (रा. पिंपळे सौदागर, पुणे) यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, नमितीचा विवाह डॉ.अमोल रकटे यांच्याशी झाला होता. मात्र, लग्नात नमिता व माहेरच्या लोकांना सासरच्या मंडळींनी खोटी माहिती देऊन दिशाभूल केली. लग्नानंतर नमिताची आई सुशीला विश्वनाथअप्पा बेंबळगे (विद्यानगर, परळी) यांचा सतत अपमान केला. 'तुम्ही लग्नात दिलेले स्त्रीधन तळतळाट करुन दिल्याने आमच्या घरावर दैवी कोप झाला आहे, त्यामुळे पुन्हा दोन लाख व एक सोन्याची अंगठी द्या' अशी मागणी केली गेली.

शिवाय सुशीला यांच्यासह त्यांचे पती व मुलगा यांना जावई डॉ. अमोल रकटे यांच्या पाया पडण्यास भाग पाडले. शिवाय चारित्र्याबद्दल संशय घेऊन सतत अपमानित केले. त्यामुळे सुशीला बेंबळगे यांनी २० एप्रिल रोजी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप नमिता रकटे यांनी केला आहे. यावरून शनिवारी पती डॉ.अमोल शरणआप्पा रकटे, सासू जयश्री शरणआप्पा रकटे, सासरा शरणआप्पा विश्वनाथआप्पा रकटे, नणंद श्रूती शरणआप्पा रकटे यांच्याविरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक जी.बी.पालवे करत आहेत.

(A case has been registered against four persons in connection with the suicide of mother-in-law at Parli Vaijnath)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ujjwal Nikam: PM मोदी अन् फडणवीसांमुळे डेव्हिड हेडलीचे स्टेटमेंट घेऊ शकलो, उज्ज्वल निकमांचा खुलासा

Panchayat 3 Release Date Out: प्रतीक्षा संपली! 'पंचायत-3' ची रिलीज डेट जाहीर, 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार सीरिज

Fact Check: धर्मांतर करा असे सांगणारा कन्हैय्या कुमार यांचा फेक व्हिडीओ पुन्हा व्हायरल; वाचा काय आहे सत्य

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Latest Marathi News Live Update : सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी आईही मैदानात

SCROLL FOR NEXT