Latur, Udgir Accident
Latur, Udgir Accident  Esakal
मराठवाडा

Accident: स्वतःच्या लग्न पत्रिका वाटपासाठी गेलेल्या नवरदेवावर काळाचा घाला; चारचाकीच्या धडकेत दोघांचा मृत्यू

युवराज धोतरे

युवराज धोतरे

उदगीर, (जि.लातुर) ता.१० : तालुक्यातील लोहारा-उदगीर रस्यावरील दुध डेअरीजळ बुधवारी (ता.१०) रोजी दुपारी पावणे एकच्या सुमारास करडखेलकडे जात असलेल्या एका दुचाकीला डस्टर गाडीने धडक दिल्याने अपघात झाला आहे. या अपघातात दोघा जनाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

याबाबत ग्रामीण पोलीस सूत्राकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, बुधवारी दुपारी पावणे एकच्या सुमारास लोहारा-उदगीर या राष्ट्रीय महामार्गावर दुध डेअरी जवळील धनमाळ येथे डस्टर क्रमांक एम एच १२ एन ई ९१५३ या गाडीने पल्सर मोटारसायकल क्र एम एच २४ बी क्यु ५८५३ या दुचाकीस धडक दिल्याने दोन दुचाकीस्वारांचा या अपघातात मृत्यू झाला आहे.

अपघातात अनुपवाडी (ता.उदगीर) येथील विशाल भिवा निलेवाड (वय- २२) व आकाश धोंडीबा निलेवाड (वय-२३) या दोघा चुलत भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले.

यातील विशाल याचे १८ एप्रिलला लग्न होते. लग्नाच्या पत्रिका देण्यासाठी ते करडखेल येथे जाणार होते. करडखेल येथे जाण्याआधीच त्यांना लोहाऱ्या जवळील धनमाळ येथे काळाने घाला घातला आहे. या घटनेने सर्वत्र खळबळू उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अनुपवाडी गावात शोककळा पसरली आहे.

या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरविंद पवार, बीटचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक श्री देवकत्ते, बीट जमादार धनंजय पडीले, राहुल नागरगोजे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मयतांना येथील सामान्य रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी दाखल केले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया ग्रामीण पोलीस ठाण्यात सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT