parbhani  sakal
मराठवाडा

Parbhani News : धावत्या कारने घेतला पेट

वसमत रोडवरील घटना, प्रवासी सुखरूप

सकाळ वृत्तसेवा

परभणी : धावत्या कारने अचानक पेट घेतल्याची घटना शहरातील वसमत रस्त्यावर शनिवारी (ता.२) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने या कारमधील प्रवासी तातडीने कारबाहेर पडल्याने त्यांचा जीव वाचला. या आगीत कारचे मोठे नुकसान झाले आहे.

काही प्रवासी चंद्रपुरहून नाशिककडे कार क्रमांक एम एच १५ ईएक्स ८१०६ यामध्ये बसून जात होते. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ते परभणी शहरातील वसमत रस्त्यावर आले. या रस्त्यावरील औद्योगिक वसाहतीच्या प्रवेशद्वार क्रमांक १ समोर आल्यानंतर कारमधून अचानक धुर निघाल्याचे कार चालकांच्या लक्षात आले. या कारमध्ये सहा प्रवाशी प्रवास करत होते. कार तातडीने थांबवून कारमधील प्रवासी बाहेर पडले. क्षणार्धातच कारने पेट घेतला. या ठिकाणी असलेल्या नागरीकांनी अग्नीशमन दलाला घटनेची माहिती दिली.

नागरीकांनी गाडीची आग विझविण्याचा प्रयत्न केला. शहर वाहतूक शाखेचे फौजदार मकसुद पठाण, पोलिस अमलदार शेख मुस्ताक, प्रल्हाद देशमुख, बालाजी जाधव, मुजीब, अनिल राठोड यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी वाहतूक कोंडी सुरळीत केली. अग्नीशमनचे गौरव देशमुख, अक्षय पांढरे, उमेश कदम, संतोष मुदिराज यांनी नागरीकांच्या मदतीने आग विझविली. सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले नाही. परंतु गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. गॅसवर असलेल्या या गाडीला आग कशामुळे लागली यांची माहिती मात्र मिळू शकली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update: महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत मंगळवारपासून २९ ऑगस्टपर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस, काय आहे हवामान खात्याचा अंदाज

Latest Marathi News Updates : राज्यात २९ ऑगस्टपर्यंत पावसाची रिपरिप, हवामान विभागाचा अंदाज

Annual Toll Pass:'टोलच्‍या वार्षिक पासवर पसंतीची मोहर'; देशात आठच दिवसांत पाच लाखांहून अधिक जणांकडे सुविधा, शासनाला मिळाला १५० कोटींचा महसूल

Ghati Medical College: ‘घाटी’तील ३५७ पदांसाठी अकरा शहरांत आजपासून परीक्षा; ‘टीसीएस’तर्फे २७ केंद्रांवर तीन सत्रांमध्ये नियोजन

Accident News : भरधाव कंटेनरची भाविकांच्या ट्रॅक्टरला धडक, ८ जणांचा जागीच मत्यू, ४३ जखमी

SCROLL FOR NEXT