Abdul Sattar has announced his support to Harshvardhan Jadhav for loksabha 2019 
मराठवाडा

Loksabha 2019 : अब्दुल सत्तारांचे वजन हर्षवर्धन जाधव यांच्या पारड्यात 

माधव इतबारे

लोकसभा 2019
औरंगाबाद : काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना सोमवारी (ता. 15) आपला पाठिंबा जाहीर केला. काँग्रेसने आपल्यावर अन्याय केला असून, जाधव यांना निवडून आणून अन्यायाचा बदला घेऊ, असा इशारा सत्तार यांनी पत्रकार परिषदेत दिला. 

लोकसभेच्या औरंगाबाद मतदारसंघातून काँग्रेसतर्फे आमदार सुभाष झांबड यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर सत्तार यांनी बंड करत अपक्ष निवडणुक लढविण्याचा निर्णय घेतला होता. समर्थकांचा मेळावा घेऊन त्यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला. मात्र अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सत्तारांनी माघार घेत 15 एप्रिलला कोणाला पाठींबा देणार हे जाहीर करू, अशी घोषणा केली होती. त्यानुसार सोमवारी पत्रकार परिषद घेऊन हर्षवर्धन जाधव यांना आपला पाठींबा जाहीर केला. मी अपक्ष लढणार होतो, मात्र माघार घेतली, त्यामुळे एका अपक्षालाच पाठींबा दिला. जाधव यांचे ट्रॅक्‍टर दिल्लीत पाठवून काँग्रेसने आपल्यावर केलेल्या अन्यायाचा बदला घेणार असे सत्तार म्हणाले. पत्रकार परिषदेला माजी खासदार रामकृष्ण बाबा यांच्यासह सत्तार गटाचे जिल्हापरिषद सदस्य, नगरसेवक उपस्थित होते. 

जालन्याचा निर्णय बैठकीनंतर :
जालन्यात कोणाला पाठींबा देणार याचे उत्तर सोमवारी रात्री बैठक झाल्यानंतर देऊ असे सत्तार म्हणाले. जाधव यांचे सासरे रावसाहेब दानवे यांना पाडण्याची भूमिका एकीकडे तुम्ही घेता, दुसरीकडे जावयाला पाठींबा देता? या प्रश्‍नावर जाधव यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या दानवे यांचा कधीच फायदा घेतला नाही, असा दावा सत्तार यांनी केला. जोपर्यंत दानवे पडणार नाहीत तोपर्यंत डोक्‍यावर केस वाढवणार नाही, या प्रतिज्ञेचा त्यांनी पुरूच्चार केली. काँग्रेसमध्ये अशोक चव्हाण हा एकमेव चांगला नेता आहे, इतर पृथ्वीराज चव्हाणांमुळे पक्षाची सत्ता गेली अशी टीकाही त्यांनी केला.

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithvi Shaw: ठरलं! मुंबई सोडलेल्या पृथ्वी शॉला मिळाला नवा संघ, आता ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार

Latest Maharashtra News Updates : एरंडोल तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी समाधानकारक पाऊस

Video: धक्कादायक! रिलसाठी अल्पवयीन मुलाने ट्रेन ट्रॅकवर जीव धोक्यात टाकला, व्हायरल व्हिडिओ

सुलतानला नऊ वर्षं पूर्ण ! सलमानने सिनेमासाठी स्वतःमध्ये घडवलेले हे पाच बदल

Tahawwur Rana : 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणी महत्त्वाची अपडेट; तहव्वूर राणानं दिली हल्ल्याची कबुली, नेमकं काय केला खुलासा?

SCROLL FOR NEXT