Corona Updates in Aurangabad Corona Updates in Aurangabad
मराठवाडा

Corona : मराठवाड्यात १ हजार ३८२ रुग्ण, कोरोनामुळे ५३ जणांचा मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद जिल्ह्यात १८५ कोरोनाबाधितांची भर पडली. त्यात शहरातील ७७, ग्रामीण भागातील १०८ रुग्ण आहेत. रुग्णांची संख्या १ लाख ४३ हजार ७४ वर पोचली आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यात (Marathwada) बुधवारी (ता.दोन) दिवसभरात १ हजार ३८२ कोरोनाबाधित (Corona) आढळले. जिल्हानिहाय नव्या रुग्णांची संख्या अशी; बीड (Beed) ३७५, उस्मानाबाद (Osmanabad) ३४०, औरंगाबाद (Aurangabad) १८५, नांदेड (Nanded) १५७, लातूर (Latur) १५१, जालना (Jalna) १०७, हिंगोली (Hingoli) ३४, परभणी (Parbhani) ३३. उपचारादरम्यान आणखी ५३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात लातुरमध्ये २५, औरंगाबाद १३, बीड ६, उस्मानाबाद ३, परभणी ३, जालना-हिंगोली- नांदेडमध्ये प्रत्येकी एकाचा समावेश आहे. (Above One Thousand Covid Cases Reported In Marathwada)

औरंगाबादेत १८५ बाधित

औरंगाबाद जिल्ह्यात १८५ कोरोनाबाधितांची भर पडली. त्यात शहरातील ७७, ग्रामीण भागातील १०८ रुग्ण आहेत. रुग्णांची संख्या १ लाख ४३ हजार ७४ वर पोचली आहे. आणखी ३६२ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत १ लाख ३६ हजार ८२४ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या ३ हजार २३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात आणखी १३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. फुलंब्री तालुक्यातील महिला (वय ६०), मांडवा (जि.औरंगाबाद) येथील पुरुष (६५), वैजापूर येथील मुलगी (१०), फुलंब्री येथील (६५), धुपखेडा येथील पुरुष (६२), सिल्लोड येथील पुरुष (६३), सिल्लोड येथील पुरुषाचा (४४) घाटी रुग्णालयात तर जडगाव येथील पुरुष (८०), चिकलठाणा येथील पुरुषाचा (६५) जिल्हा रुग्णालयात, मयूर पार्क भागातील महिला (८०), जटवाडा रोड, सवेरा पार्क येथील पुरुष (५२), आकाशवाणी परिसरातील पुरुष (६७), जवाहर कॉलनीतील महिलेचा (७४) खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. जिल्ह्यातील मृतांची संख्या ३ हजार २२७ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: १९९४ चा जीआर नेमका काय आहे? मराठा समाज आरक्षणाबाहेर राहिला, कारण...

BCCI ची अब्जावधींची कमाई होते तरी कशी? भारताच्या तुलनेत पाकिस्तान क्रिकेट बोर्ड किती कमावतो पैसा, जाणून घ्या

Latest Marathi News Updates : गावातील रस्त्याना आले नदीचे स्वरूप

Pune Crime : ‘एनएचएम’ मधील अधिकारी कर्मचाऱ्यांना कोटयावधींचा गंडा; नोकरीत कायम करण्‍याच्‍या नावाखाली उकळले ७५ कोटी

Pakistan admits: मोठी बातमी! अखेर पाकिस्तानला कबूल करावंच लागलं ; 'अमेरिकेच्या मध्यस्थीसाठी कधीच तयार नव्हता भारत'

SCROLL FOR NEXT