manapa 
मराठवाडा

निर्जंतुकीकरण केल्यावरच मिळणार ‘या’ महापालिकेत प्रवेश 

सकाळ वृत्तसेवा

परभणी : ‘कोरोना’ संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या प्रवेशद्वारातच निर्जंतुकीकरण कक्ष उभारण्यात आला असून पालिकेत येणाऱ्या सर्वांना या कक्षातूनच प्रवेश बंधनकारक करण्यात आल्याची माहिती आयुक्त रमेश पवार यांनी दिली.

राज्यात सर्वत्र कोरोना रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असतानाही परभणीत मात्र अद्यापही या विषाणूची बाधा झालेली नाही हे विशेष तरीदेखील महापालिका प्रशासन त्यासाठी याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करीत असल्याचे चित्र आहे. आता महापालिकेच्या प्रवेशद्वारावरच निर्जंतुकीकरण कक्ष उभारण्यात आला असून त्या कक्षामधूनच सर्वांना येणे अनिवार्य करण्यात आले आहे. ज्यामुळे या विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये याची खबरदारी पालिका प्रशासन घेत असल्याचे चित्र आहे.

यांच्या उपस्थितीत केला कक्ष सुरु
शुक्रवारी दुपारी या निर्जंतुकीकरण कक्षाची सुरुवात आयुक्त रमेश पवार, माजी नगरसेवक रवींद्र सोनकांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. या वेळी उपायुक्त रवींद्र जायभाये, सहायक आयुक्त अल्केश देशमुख, शहर अभियंता वसीम खान पठाण आदींच्या उपस्थितीत करण्यात आली.

रॅपिड रिस्पॉन्स टीम सज्ज
महापालिकेने प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र रॅपिड रिस्पॉन्स टीम सज्ज ठेवले असून आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तीन ते चार तासात त्या प्रभागाचा संपूर्ण बंदोबस्त करण्याची जबाबदारी राहणार असल्याची माहिती पवार यांनी यांनी दिली. 

एक हजार बेडची देखील व्यवस्था
प्रत्येक प्रभागासाठी जवळपास पन्नास अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचा या पथकात समावेश आहे. खाजगी रुग्णालये, खाजगी संस्था, शासकीय संस्था आदींच्या मदतीने जवळपास एक हजार बेडची देखील व्यवस्था करून ठेवली जाणार असल्याचे ते म्हणाले. 

जिल्हाधिकारी, आयुक्त यांच्यात दररोज बैठका 
महापालिका प्रशासन जिल्हा प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहे. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर व महापालिकेचे आयुक्त रमेश पवार यांच्यात दररोज बैठका होत आहेत त्यातून शहरातील परिस्थितीचा आढावा घेण्याबरोबरच उपाययोजना देखील देखील केल्या जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran Ceasefire : अमेरिका- इराण युद्धाविरामामुळे भारताला दिलासा; हॉर्मूझची सामुद्रधुनी खुली होताच एलपीजी पुरवठा होणार सुरळीत

Sports News: पलक-मुकेश नेलावल्ली यांची विश्वविक्रमासह सुवर्ण झेप; भारताचा अभिमान उंचावला

दिंडोरीवर पुन्हा शोककळा! चार शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू, तर झोक्याचा फास लागून एकाचा अंत

अमेरिकेची २ आठवडे युद्धबंदी! पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं कॉपी पेस्ट ट्विट; स्क्रीप्ट ट्रम्पनी लिहून दिली?

Sports News: आशियाई बॅडमिंटन स्पर्धा;भारताचे दुहेरीत संमिश्र यश

SCROLL FOR NEXT