Accident Esakal
मराठवाडा

Accident: अजिंठा-बुलढाणा महामार्गावर भीषण अपघात, एक जण जागीच ठार

Marathwada: गावातून किराणा दुकानातून काहीतरी किराणा सामान घेऊन तो घरी जात असताना आयशर क्रमांक म्हणून

कैलास दांडगे

Latest Buldhana News: घराच्या वास्तू शांतीच्या कार्यक्रमाच्या दिवशीच एका तरुणाच्या दुचाकीला आयशरने जोराची धडक दिल्याने जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी (ता. 30)दुपारी अजिंठा -बुलढाणा या महामार्गावर वाढोना गावाजवळ घडली.

याप्रकरणी पारध पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे. याविषयी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, भोकरदन तालुक्यातील वाढोना येथील युवक सतीश घोरपडे (वय 23 )यांनी नुकतेच नवीन घर गावाशेजारी बांधले होते, शुक्रवारी त्याच्या घराची वास्तू शांतीचा कार्यक्रम असल्यामुळे गावातून किराणा दुकानातून काहीतरी किराणा सामान घेऊन तो घरी जात असताना आयशर क्रमांक म्हणून.

18 BA 0142 हा भरधाव अजिंठा कडून बुलढाणा कडे जात होता यावेळीच रस्त्याच्या साईडने आपली दुचाकी घेऊन घरी जाणाऱ्या सतीशला या आयशर ट्रकने धडक देऊन सुमारे 25 ते 30 फूट फरपटत नेले त्यानंतर हा आयशर ट्रक आजूबाजूचे शेतकरी, ग्रामस्थ धावल्यावर थांबला आणी अपघात झाल्याचे कळताच त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला यावेळी स्थानिक नागरिकांनी या तरुणाला पाहिले असता तो आपल्या गावातील सतीश घोरपडे असल्याचे समोर आल्याने ग्रामस्थांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला मात्र उशीर झाल्यामुळे सतीशचा घटनास्थळावरच मृत्यू झाला.

या अपघाताची माहिती पारध पोलिसांना देण्यात आल्यावर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून ट्रक ताब्यात घेतला आहे, मात्र सुमारे अर्धा तास या तरुणाची मृत्यूदेह महामार्गांवरच पडून होता. एक तरुण ठार झाल्यामुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT