Hingoli
Hingoli  Sakal
मराठवाडा

Hingoli : दसरा महोत्सवाच्या कार्यालयास आग

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : येथील रामलीला मैदानावर असलेल्या दसरा समितीच्या कार्यालयाला गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास अचानक आग लागली. आगीचे वृत्त कळताच नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांनी अग्निशमन विभागाला घटनास्थळी पाठवले. त्यानंतर आग आटोक्यात आली. मात्र, आगीचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही.

येथील रामलीला मैदानावर दसरा समितीचे कार्यालय आहे. कार्यालयाच्या आत समितीचे विविध साहित्य यासह दसरा महोत्सवात वापरण्यात आलेले पुतळे ठेवण्यात आलेले होते. गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास कार्यालयातून धुराचे लोट उठू लागले.

आग लागल्याचे समजताच नागरिकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी पळापळ केली. दरम्यान, नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला मुख्याधिकारी श्री. मुंढे यांनी घटनास्थळी बंब घेऊन पाठविले. त्यानंतर अग्निशमन दलाचे प्रमुख बाळू बांगर, दिलीप दोडके, अफसर खा पठाण घटनास्थळी स्थळी बंब घेऊन दाखल झाले. त्यांनी आग आटोक्यात आणली. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकारी व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यामध्ये साहित्य जळून नुकसान झाले आहे. दरम्यान, ही आग शॉर्ट सर्किटने लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT