File photo 
मराठवाडा

पिस्तूल पाहताना दबले ट्रिगर, एकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

भूम /उस्मानाबाद : पिस्तूल हाताळताना चुकून ट्रिगर दबल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना पाटसांगवी (ता. भूम) येथे शनिवारी (ता. २९) दुपारी तीन ते चारच्या सुमारास घडली. घटनेनंतर पिस्तूल परवानाधारक युवकाने वालवड येथील पोलिस दूरक्षेत्रात हजर होत घडलेला प्रकार सांगितला. गंभीर जखमी युवकाला उपचारासाठी बार्शी येथे हलविण्यात आले होते; मात्र डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दस्तगीर जिलानी पटेल (वय ४०, रा. पाटसांगवी) असे मृताचे नाव आहे. मृत दस्तगीर पटेल हा मित्र बाबा पटेल (रा. पाटसांगवी, ह. मु. पुणे) याच्यासमवेत जेवणासाठी गेला होता. यावेळी त्यांनी मद्यप्राशन केले होते. दरम्यान, बाबा पटेल याच्याकडे असलेली पिस्तूल दस्तगीर हाताळत असताना चुकून ट्रिगर दबल्याने गोळी लागून तो गंभीर जखमी झाला.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दस्तगीरला उपचारासाठी तत्काळ बार्शी येथे हलविण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. माहिती मिळताच भूमचे पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ, सहायक पोलिस निरीक्षक मंगेश साळवे घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. 

दरम्यान, मद्यधुंद अवस्थेतील दस्तगीरने पिस्तूल बघण्याची इच्छा व्यक्त केली. यावेळी पिस्तूल हाताळत असताना चुकून ट्रिगर दबल्याने गोळी लागून त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाल्याचे अपर पोलिस अधीक्षक संदीप पालवे यांनी सांगितले. हा प्रकार घडल्यानंतर ज्याच्या मालकीचे पिस्तूल आहे, त्याने तत्काळ वालवड येथील पोलिस दूरक्षेत्र गाठून घडलेला प्रकार सांगितला. त्यास ताब्यात घेत चौकशी सुरू केली असल्याचेही श्री. पालवे यांनी सांगितले.

या घटनेने गावामध्ये एकच खळबळ उडाली असून, चर्चेला उधाण आले आहे. भूम पोलिस ठाण्याचे पथक तातडीने बार्शीकडे रवाना झाले आहे. नातेवाइकांकडून अधिक माहिती घेतली जाणार असून, नेमकी माहिती समोर आल्याशिवाय याप्रकरणी काहीही सांगता येणार नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बँकांचा ३ दिवसांचा संप मागे! बैठकीनंतर रात्री उशिरा निर्णय; काय झाली चर्चा?

विश्रांतवाडीत ११ वर्षीय मुलीवर हातपाय बांधून अत्याचाराचे आरोप, ५२ वर्षांच्या नराधमाला अटक; रस्ता रोको आंदोलन

Divya Shinde Arrest : बिग बॉस मराठी फेम अभिनेत्रीची पोलीस कोठडीत रवानगी, डॉक्टरसोबत का झालेला वाद?

Virat Kohli Records: विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड; जगात असा पराक्रम कुणी केला नव्हता, गावस्करांच्या विक्रमाशीही बरोबरी

Pune Crime: गणेश विसर्जन मिरवणुकीतील गर्दीत चोरट्यांचा डल्ला; पुण्यात १४ घटनांत ९.७७ लाखांचे दागिने लंपास

SCROLL FOR NEXT