संग्रहित छायाचित्र  
मराठवाडा

कोरोना तपासणीला नेलेल्या आरोपींची बीडच्या रुग्णालयातून धूम 

सकाळ वृत्तसेवा

बीड - मारहाण प्रकरणात न्यायालयीन कोठडी सुनावणलेल्या आरोपींना कोरोना तपासणीसाठी रुग्णालयात आणल्यानंतर त्यांनी धुम ठोकल्याची घटना सोमवारी (ता. चार) रात्री १० वाजता घडली. 

शेख इरफान शेख बिबन (नवल्या) आणी असेफ गफार बागवान अशी पलायन केलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. सिरसाळा येथील नवाज खान आयुबखान पठाण या युवकास शेख इरफान शेख बिबन (नवल्या) आणि असेफ गफार बागवान या दोघांनी बाहेरगावी जाण्यासाठी दुचाकी का दिली नाही असे म्हणत रस्त्यावर अडवून बेल्ट, दगडाने मारहाण करून जखमी केले. शनिवारी (ता. दोन) घडलेल्या घटनेप्रकरणी या दोन्ही आरोपींना अटक केली.

परळी न्यायालयाने सोमवारी या दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावली. सिरसाळा पोलिसांनी दोन्ही आरोपींना शासकीय वाहनाने बीडला आणले. आरोपींना घेऊन दुपारी चार वाजता कारागृहात दाखल केल्यानंतर या आरोपींची कोरोना तपासणी करून आण्याच्या सुचना देण्यात आल्या. त्यामुळे पुन्हा या दोघांना त्याच वाहनातून जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी दाखल केले. जवळ कोणी नसल्याचा फायदा घेत स्वॅब घेण्याआधीच आरोपी इरफान व असेफ याने पलायन केले. या प्रकरणी जमादार शिवाजी मुंडे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात पलायन केले म्हणून दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TomTom Traffic Index 2025: पुणेकरांची दैना! Traffic Jam मध्ये भारतात पटकवला दुसरा नंबर, 10 किमीसाठी लागतो इतका वेळ

Mumbai Local: मुंबई रेल्वे नेटवर्कचा चेहरा बदलणार! जोगेश्वरी गुड्स यार्ड वसई-नायगावला हलणार; काय फायदा होणार?

Dhule Municipal Election : धुळ्यात राष्ट्रवादी-शिवसेना युती फिस्कटली; 'एमआयएम'ला विरोधी पक्षनेतेपदाची लॉटरी लागणार?

राज्यभर दहावी-बारावी परीक्षांचा महासंग्राम, 16 लाखांहून अधिक परीक्षार्थी; जाणून घ्या सविस्तर माहिती एका क्लिकवर

Maoist Commander Killed : तब्बल एक कोटींचा इनाम असलेल्या माओवादी कमांडरसह आठ नक्षलवाद्यांचा खात्मा!

SCROLL FOR NEXT