file photo 
मराठवाडा

‘त्या’ गोळीबार प्रकरणातील आरोपीची कोठडी वाढली 

प्रल्हाद कांबळे

नांदेड : कॉंग्रेस कार्यकर्ता गोविंद कोकुलवार गोळीबार प्रकरणातील विरेंद्र भंडारी याची औरंगाबाद येथील मोक्का न्यायालयात पोलिस कोठडी संपल्याने त्याला परत शनिवारी (ता. चार) जानेवारी रोजी हजर केले. यावेळी न्यायाधिश एस. एन. भोसले यांनी ता. १० जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी वाढवून दिली. श्री. कोकुलवार यांच्यावर ऑगस्ट २०१९ मध्ये पिस्तुलाद्वारे प्राणघातक हल्ला झाला होता. 

या प्रकरणात प्रत्यक्ष गोळीबार करणारे दोन, त्यांना हत्यार पुरवणारे आणि मदत करणारे तीन असे पाच आरोपी अटक झाले. याप्रकरणात या सर्व हल्ल्याचा मुख्य सुत्रधार हरविंदरसिंघ उर्फ रिंदा संधू हा अद्याप फरार आहे. या तपासादरम्यान पोलीस उपअधिक्षक (इतवारा) धनंजय पाटील यांनी ता. २७ डिसेंबर रोजी विरेंद्र उर्फ वीरू सोपानराव कानोजी उर्फ भंडारी याला अटक केली. मोक्का न्यायालय औरंगाबाद यांनी विरेंद्र उर्फ विरू कानोजी उर्फ भंडारीला ता. २८ डिसेंबर ते ता. चार जानेवारी असे पोलीस कोठडीत पाठविले.

विरू भंडारीच्या अडचणीत वाढ

शनिवारी (ता. चार) विरु भंडारीची पोलीस कोठडी संपल्यानंतर पोलीस उपअधिक्षक धनंजय पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी विरु भंडारीला पुन्हा औरंगाबादच्या मोक्का न्यायालयात हजर केले. पोलीस कोठडी वाढवून देण्यासाठी सादरीकरण झाले त्यात असे मुद्दे मांडण्यात आले की, नांदेडच्या गुरदिपसिंघ अखबारवाले यांनी दिलेल्या जबाबात विरु भंडारी यांनी मदत करून वळण रस्त्यावर असलेल्या चार एकर जागेचा ताबा रिंदाचे वडील चरणसिंघ संधू यांना मिळवून दिला. सोबतच पोलीसांनी विरेंद्र भंडारीकडून सात मोबाईल जप्त केले आहेत. त्या मोबाईलच्या अभिलेखात विरेंद्र भंडारी हा रिंदाशी संपर्कात होता असे पुरावे आहेत. सोबतच विरेंद्र भंडारीच्या घरून अनेक भुखंडांचे कागदपत्र सापडले आहेत. ते भुखंड वादग्रस्त आहेत. गोविंद कोकुलवारचे पुत्र आणि कॉंग्रेसचे नगरसेवक नागेश कोकुलवार यांच्याकडे असलेला मोबाईल ज्यावर रिंदाने धमकी दिली होती. तो मोबाईलनंबर विरेंद्र भंडारीच्या मोबाईल अभिलेखात सापडला आहे. 

विरु भंडारीचे रिंदाशी संपर्क

मोक्का न्यायालयात सादर करण्यात आल्याप्रमाणे विरु भंडारीचा कबुली जबाब नोंदविण्यात आला आहे. ज्या- ज्या लोकांना रिंदाकडून खंडणीसाठी धमक्या येत होत्या. त्या सर्वांचे सेटलमेंट विरु भंडारीनेच केले असा अभिलेख आहे. या संदर्भाने पोलीसांनी केलेले सादरीकरण ऐकूण मोक्का न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस. एन. भोसले यांनी विरु भंडारीला ता. १० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी वाढवून दिली आहे. या तपासासंदर्भाने पोलीस उपअधिक्षक धनंजय पाटील यांनी एक पोलीस अधिकारी आणि कांही पोलीस कर्मचाऱ्यांना याच प्रकरणात जबाब देण्यासाठी आपल्या कार्यालयात बोलावले होते. त्याबद्दल अधिकची काही माहिती पुढे आली नाही. या प्रकरणात पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर आणि अतिरिक्त पोलिस अधिक्षक दत्ताराम राठोड हे लक्ष ठेवून आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agricultural News : सरकारी धोरणानं कांदा उत्पादकांना रडवलं, भारताच्या निर्यात महसुलात ११०० कोटींची घट; बांगलादेश-पाकिस्तानने साधली संधी

T20 WC, IND vs PAK: जावई असला म्हणून काय झालं? भारताविरुद्धच्या पराभवानंतर आफ्रिदी चिडला, थेट तिघांच्या हकालपट्टीची मागणी

Satara : गुरुजी हे वागणं बरं नव्हं! 'व्हॅलेंटाइन डे'ला विद्यार्थीनीलाच प्रपोज; वर्गातून बाहेर बोलवत पकडला हात

केमिकल कंपनीत अग्नितांडव, ८ कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू; लागोपाठ स्फोट अन्...

Pune News: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे पुण्याहून रेल्वेच्या सेवेत वाढ; नेमक्या कशा धावणार गाड्या..

SCROLL FOR NEXT