court_7_0.jpeg 
मराठवाडा

बीड : प्रेयसीला अॅसिड व पेट्रोल टाकून जाळणाऱ्या नराधमाला आठ दिवसांची पोलीस कोठडी 

दत्ता देशमुख

बीड : अॅसिड व पेट्रोल टाकून प्रेयसीला जळणाऱ्या नराधमाला न्यायालयाने आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अविनाश राजुरे या आरोपीला पोलिसांनी सोमवारी (ता. १६) प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर केले. शनिवारी (ता.१४) पहाटे आरोपीने प्रियसीला अॅसिड व पेट्रोल टाकून जाळले. त्यानंतर याच दिवशी रात्री उशिरा पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
 
नांदेड जिल्ह्यातील देगलुर तालुक्यातील शेळगाव येथील सावित्रा दिगंबर अंकुलवर (वय २२) व याच गावातील अविनाश रामकिसन राजुरे (वय २५) यांच्यात प्रेमसंबंध होते. सावित्रा विवाहित होती. मात्र मागच्या दोन वर्षांपासून दोघे पुणे येथे एकत्र राहत होते. दरम्यान, शुक्रवारी (ता.१३) दुपारी दोघे पुण्याहून गावाकडे दुचाकीवरून निघाले. उशीर झाल्याने सावित्रा आणि अविनाश बीड तालुक्यातील येळंबघाट येथील रस्त्याच्या बाजूला असलेल्या खदानीत थांबले. शनिवारी (ता.१४) पहाटे अविनाश याने सावित्रा हिच्या अंगावर अॅसिड व पेट्रोल टाकून पेटवून दिले आणि पळ काढला. भाजलेली सावित्रा विव्हळत होती. मात्र रस्त्यापासून दूर असल्याने तिचा आवाज कोणाला ऐकू आला नाही. त्यामुळे शनिवारी दुपारपर्यंत ती तशीच तडफडत होती. 

अखेर एका गुराख्याला ती आढळल्यानंतर नेकनूर पोलिस घटनास्थळी पोचले आणि तिला उपचारासाठी बीड येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र शनिवारी रात्री साडेअकरा वाजता सावित्रा हिचा मृत्यू झाला. सुरुवातीला सावित्रीचा जबाबवरून आरोपी अविनाश राजुरे ह्याच्या विरोधात नेकनूर पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद झाला होता. नंतर खुनाचा गुन्हा नोंद झाला. दरम्यान, रविवारी (ता. १५) आरोपी अविनाश राजुरे याला देगलूर पोलिसांच्या मदतीने देगलूर येथून अटक करण्यात आली. सोमवारी त्याला उपविभागीय पोलीस अधिकारी भास्कर सावंत यांनी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कादिर अहमद न. सरवरी यांच्या समोर हजर करण्यात आले. त्यांनी आरोपीला आठ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

(संपादन-प्रताप अवचार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! ‘या’ विद्यार्थ्यांना दरवर्षी मिळणार 12,000 शिष्यवृत्ती; वार्षिक उत्पन्न 3.50 लाख रुपये अन्‌ आठवीत पाहिजे ५५ टक्के गुण

मोठी बातमी! दारूचे दर वाढले अन्‌ विदेशी दारूचा खप झाला कमी; बनावट दारू व हातभट्टीची वाढली विक्री; दुकानदारांकडूनही हिशेबात चलाखी, वाचा...

Christmas Special: केळीपासून फक्त बनाना केकच नाही! ‘हे’ 5 ख्रिसमस रेसिपी ट्राय करा, सगळे विचारतील सीक्रेट

आजचे राशिभविष्य - 25 डिसेंबर 2025

Budget International Trip: नव्या वर्षात कमी खर्चात परदेशभ्रमंतीचा प्लॅन? 7 दिवस-6 रात्रीसाठी 'हे' ठिकाण आहे परफेक्ट!

SCROLL FOR NEXT