file photo 
मराठवाडा

महावितरणकडून ‘यांच्या’वर कारवाई

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : महावितरण कंपनीकडून विज चोरीवर आळा घालून विज बील वसुलसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या दरम्यान उस्माननगरच्या पथकाने शिराढोण येथे कारवाई करून १५ आकोडेबहाद्दरांवर कारवाई केली. त्यांच्याविरुध्द लोहा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

महावितरणकडून विजचोरीवर आळा बसावा यासाठी सतत कारवाईचे सत्र सुरू केले आहे. अनेक थकबाकीदार विज ग्राहक विजबिल भरत नाहीत. त्यामुळे महावितरणचा महसुल बुडत आहे. नियमीत विजबिल भरणाऱ्या ग्राहकांना महावितरणची सेवा सुरळीत मिळावी म्हणून थकबाकीदाराविरुध्द कारवाईचे सत्र सुरू केले आहे. महावितरणच्या उस्माननगर उपविभागाचे सहाय्यक अभियंता तुषार वाघमारे यांनी आपल्या पथकाला सतर्क केले. या पथकांनी शिराढोण (ता. कंधार) येथे कारवाई केली. यावेळी गावात शिरताच विज पुरवठा करणाऱ्या तारावंर आकोड्याचे जाळे दिसून आले. या पथकांनी सर्व आकोडे सर्व प्रथम जप्त केले. 

विजेच्या खांबावर आकोड्याचे जाळे

यावेळी तारावरील टाकलेले आकोडे सर्वीस वायर जप्त करून ज्यांनी- ज्यांनी विज चोरी केली त्यांच्याविरुध्द लोहा पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. २३) १५ जणांवर गुन्हा दाखल केला.  कारवाई ता. दोन नोव्हेंबर रोजी केली होती. ६४ हजार ८५४ रुपयाची विज चोरी झाल्याचे उघड झाले. यावेळी तडजोडअंती ४१ हजार रुपये देण्याचे ठरले. यातून जवळपास सहा हजार ८३३ युनीटची चोरी झाली होती.  या प्रकरणी सहाय्यक अभियंता तुषार वाघमारे यांच्या फिर्यादीवरून कृष्णा सोळंके, सदानंद भूरे, काशिराम बिचेवार, दिगांबर कपाळे, इसाक शेख, रामदास जाधव, भगवान कळसे, दस्तगीर अल्लाबक्ष लालकुंभार, शिवाजी राठोड, रेणूका राठोड, भोजू जाधव, विश्‍वनाथ कपाळे, दशरथ गायकवाड, मुजीब लालकुंभार, चंद्रकंत नांदेडे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला. तपास पोलिस निरीक्षक बालाजी मोहिते करीत आहेत.

महावितरणचे आवाहन

जिल्ह्यातील सर्वच स्तरातील विज ग्राहक थकबाकीदार यांनी आपल्याकडील थकबाकी भरावे असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे. जिल्ह्यात मोठ्या संख्येने विज ग्राहकांकडे थकबाकी आहे. त्यांनी जर थकबाकी वेळेत भरली तर विजपुरवठा सुरळीत ठेवता येते. थकबाकीदारांमुळे नियमीत वीज बिल भरणाऱ्या विज ग्राहकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे विज पुरवठा खंडीत करण्याची कारवाई सुरू आहे. थकबाकीदारांनी आपल्याकडील थकबाकी भरून महावितरणला सहकार्य करा असे आवाहन केले. 
संतोष वहाने, अधिक्षक अभियंता, महावितरण, नांदेड.      

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ज्यांच्या ठसक्याने रंगायचा लावणीचा फड! त्या शकुंतलाताई नगरकर काळाच्या पडद्याआड, कलाविश्वावर शोककळा

Latur Water Crisis : उजनी’ची व्यवहार्यता लालफितीतच; मुख्यमंत्र्यांना लातूरचा दुष्काळ अवगत; पण दहा वर्षांत शाश्वत उपाययोजनाच नाही

Vidarbha Orange Alert : विदर्भाला ‘ऑरेंज अलर्ट’; राज्यात तीन दिवस पावसाची शक्यता पुणे घाटमाथ्याला ‘यलो अलर्ट’

Asian Games 2026: भारताची नारी शक्ती! नेमबाजांनी जिंकलं कांस्य; मनू भाकरला अपयश पण, कबड्डीत महिलांची बाजी

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लातूरमध्ये दाखल

SCROLL FOR NEXT