जालना : कारवाई करताना नगरपालिकेचे कर्मचारी व पोलिस. 
मराठवाडा

जालन्यात कोरोनाचा विसर पडलेल्यांवर कारवाई 

उमेश वाघमारे

जालना - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जालना शहरामध्ये सुरक्षित अंतर न पाळणाऱ्या तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्यांवर शुक्रवारी (ता.१९) पोलिस प्रशासन व नगरपालिकेमार्फत संयुक्तरीत्या दंडात्मक कारवाई करण्यात आली. यात १५२ जणांवर कारवाई करीत ४५ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांनी दिली आहे. 

जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या साडेतीनशे पार झाली आहे; मात्र तरी देखील शहरात सुरक्षित अंतर व मास्क वापरण्याचे नियम पाळण्यास अनेक जण धजत नाहीत. त्यामुळे नगरपालिकेसह पोलिस प्रशासनाने सुरक्षित अंतर व विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरवात केली आहे.

जालन्यात शुक्रवारी (ता.१९) शहरामध्ये सुरक्षित अंतर न राखणाऱ्या १०९ जणांकडून २१ हजार ९०० रुपये तर सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या ४३ जणांकडून २१ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. 

दरम्यान, नागरिकांनी आवश्यकता नसताना घराबाहेर पडू नये, सुरक्षित अंतराचे पालन करावे, मास्कचा वापर करावा; तसेच प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहनही मुख्याधिकाऱ्यांनी केले आहे. 

वाहतुकीच्या मार्गात बदल 

जालना शहरात अनेक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधित आढळलेल्या भागातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. 
नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी कोरोनाग्रस्त रुग्ण आढळलेला शहरातील काही भाग सीलबंद करण्यात आला आहे. तरी या भागातून पुढे जाणारे वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही यासाठी पोलिस अधीक्षक चैतन्य एस. यांनी जालना शहरातील सध्या प्रचलित मार्गावरील जाणाऱ्या व येणाऱ्या वाहतुकीत ता. २० जूनपासून बदल केला आहेत. यात पाणीवेस ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा हा मार्ग बंद करण्यात आला आहे. पर्यायी मार्ग म्हणून पाणीवेस ते महावीर चौक ते मामा चौक ते फुलबाजार मार्गे पाणीवेस ते महावीर चौक ते मामा चौक ते मुर्गीतलाव व पाणीवेस ते राजमहल टॉकीज ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा असा करण्यात आला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: ठाण्यात मध्यरात्री तरुणांचा जीवघेणा थरार! भरधाव कारच्या बोनेटवर बसून स्टंटबाजी, Viral Videoमुळे खळबळ

Sangli District Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीत पक्षीय राजकारण नको आमदार जयंत पाटील ; राज्यात दुष्काळ जाहीर करा

IPL 2027 News: खेळाडू की मार्गदर्शक? CSK ने MS Dhoni ची भूमिका जाहीर केली; मुख्य प्रशिक्षकपदी झहीर खान बसताच मोठी घोषणा

Marathi News Live Updates : छात्रों की गूंज' हा पुढील कार्यक्रम चेन्नईमध्ये

Konkan Railway Debt Repayment : रोहा-वीर दुहेरीकरण ते चिनाब ब्रिजची निर्मिती, कोकण रेल्वेचा 5 वर्षांत कायापालट; 23,500 कोटींचे नवीन प्रकल्प हाती

SCROLL FOR NEXT