file photo 
मराठवाडा

बोगस बियाणे, खत विक्री केल्यास होणार कारवाई

राजेश दारव्हेकर

हिंगोली : खरीप पेरणीच्या हंगामात शेतकऱ्यांना योग्य प्रतीची बियाणे उपलब्ध व्हावेत, बोगस बियाणे, खताची विक्री होणार नाही यासाठी तालुका स्तरावर व जिल्हा स्तरावर पथके तैनात केली असून चढ्या दराने किंवा बोगस खत, बियाणे विक्री केल्याचे आढळून आल्यास अशा कृषी केंद्रांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हा कृषी विकास अधिकारी निलेश कानवडे यांनी दिली.

खरीप हंगामाला सुरुवात झाली असून शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरू आहे. एकीकडे कृषी विभाग चांगला किंवा दमदार पेरणीयोग्य पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका, असे आवाहन करीत असताना दुसरीकडे शेतकरी मात्र दोन पावसानंतर पेरणीच्या तयारीला लागले आहेत. 

तालुका स्तरावर पथक स्थापन

जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी निलेश कानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुका स्तरावर पथक स्थापन करण्यात आली आहेत. ही पथके कृषी केंद्रांची तपासणी करणार आहेत.

पथकाकडून केंद्रांना नियमित भेटी

 नियुक्त पथकाकडून शेतकऱ्यांना खत, बियाणे उपलब्ध करून देणे, तसेच कृषी केंद्र, औषधी विक्रेते, वितरक यांच्या केंद्रांना नियमित भेटी देऊन सूचना देणे, याशिवाय दुकानातील साठा तपासणी, अधिसूचित नसलेले बियाणे, खत, कीटकनाशके आढळून आल्यास पथकांकडून कारवाई केली जाणार आहे.

तक्रारी असल्यास संपर्क साधावा

 तसेच बोगस खत, बियाणे विक्री करून शेतकऱ्यांना फसविल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे श्री. कानवडे यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी बियाणे, खत खरेदी केल्याचे बिल घ्यावे, काही तक्रारी असल्यास तालुका स्तरावरील कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, कृषी केंद्राच्या भूलथापांना बळी न पडता शासनाने मान्यता दिलेला खत, बियाणे खरेदी करून पक्के बिल घ्यावे, असे श्री. कानवडे यांनी सांगितले.

कृषी विभागाच्या वतीने खबरदारी

काही दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्यात बोगस खत विक्री करणाऱ्या गोदामावर पोलिसांनी छापे मारून हजारो टन खत साठा जप्त केला आहे. तसेच संबंधितांवर गुन्हेदेखील दाखल झाले आहेत. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातदेखील बोगस खत विक्री होणार नाही, यासाठी पथकांची करडी नजर राहणार आहे. त्यानुसार कृषी विभागाच्या वतीने खबरदारी म्हणून ऐन पेरणीच्या हंगामात काळजी घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Divorce Petition :‘काळा रंग, जाडजूड शरीरयष्टी’वरून पत्नी टोमणे मारते; पतीने मागितला घटस्फोट, हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

लग्नाला १२ वर्ष होतील तरीही मला कळलेलं नाही की... श्रेया बुगडेने सांगितलं नवरा निखिल सेठसोबत कसं आहे नातं

Petrol-Diesel Price: कच्चे तेल महाग होत असताना आता भारतात पेट्रोल-डिझेलचे भाव वाढणार का? सरकारकडून स्पष्टीकरण

Maharashtra Ganesh Visarjan Live: लालबागच्या राजाची आरती सुरू

IND vs WI 1st ODI: ऋतुराज गायकवाड IN, यशस्वी जैस्वाल बाकावरच! नबीचे पदार्पण; पहिल्या वन डेसाठी तगडी Playing XI

SCROLL FOR NEXT