Latur News  sakal
मराठवाडा

Latur News : पोलिस पाटलांच्या खांद्यावर अतिरिक्त ओझे ; लातूर जिल्ह्यात ४०० वर गावांत नियुक्तीच नसल्याचा परिणाम

गाव पातळीवर महसूल व पोलिस विभागासाठी महत्त्वाचा दुवा म्हणून गावच्या पोलिस पाटलांकडे पाहिले जाते. गाव पातळीवर होणाऱ्या बुहतांश कामात पोलिस पाटलांची मदत घेतली जाते.

सकाळ वृत्तसेवा

लातूर : गाव पातळीवर महसूल व पोलिस विभागासाठी महत्त्वाचा दुवा म्हणून गावच्या पोलिस पाटलांकडे पाहिले जाते. गाव पातळीवर होणाऱ्या बुहतांश कामात पोलिस पाटलांची मदत घेतली जाते. असे असताना देखील जिल्ह्यातील ४०० पेक्षा अधिक गावात पोलिस पाटीलच नाहीत. त्यामुळे जवळ असलेल्या गावातील पोलिस पाटलांच्या खांद्यावर इतर गावाचे ओझे दिले जात आहे. त्यामुळे काम करताना या पोलिस पाटलांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

गावात पोलिस पाटील एक महत्त्वाचे पद आहे. त्यांच्या खांद्यावर अनेक जबाबदाऱ्यांचे ओझे आहे. महसूल विभागाचा उपक्रम, कार्यक्रम असला की पोलिस पाटलांना कामाला लावले जाते. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला की पोलिसांना पोलिस पाटलांची आठवण येते. पोलिस पाटलांच्या कामाला वेळेचेही बंधन नाही. रात्रंदिवस त्यांना आपली जबाबदारी पार पाडावी लागत आहे.

जिल्ह्यात प्रत्येक गावात पोलिस पाटील असला पाहिजे. पण जिल्ह्यात ८५० पैकी ४०० पेक्षा अधिक गावात पोलिस पाटीलच नाहीत. त्यामुळे जवळच्या दोन तीन गावाचा अतिरिक्त भार या पोलिस पाटलांवर दिला जात आहे. पण त्याचे वेगळे मानधन मात्र दिले जात नाही. यात काही गावात महिला पोलिस पाटील आहेत. त्यांच्यावर देखील दुसऱ्या गावचा भार टाकण्यात आला आहे. रिक्त पदे भरण्याकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

मानधनात झालीय वाढ

गावात पोलिस पाटील महत्त्वाचा असला तरी त्यांना मानधनावर काम करावे लागत आहे. वाढत्या महागाईच्या काळातही त्यांचे मानधन वाढवले जात नव्हते. संघटनानी अनेक वेळा आंदोलन करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. पण गेल्या आठवड्यात आचारसंहिता लागण्यापूर्वी ता. १५ मार्च रोजी शासनाने मानधनात मोठी वाढ केली आहे. आता पोलिस पाटलांना दरमहा पंधरा हजार रुपये मानधन मिळणार आहे. त्यामुळे पोलिस पाटलांत आनंद व्यक्त केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रज्वल रेवन्नाचा आणखी एक कारनामा; तुरुंगात जप्त केलेल्या मोबाइलमध्ये सापडले १४५ हून अधिक अश्लील व्हिडीओ

Social Media Election Rules : निवडणूक प्रचारात डीपफेक व्हिडिओ वापराल तर कारवाई; आयोगाचे राजकीय पक्षांना कडक निर्देश

'मी जे केलं ते तुम्ही करू नका...' सिंगल मदरहुडबद्दल नीना गुप्तांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या...

Chanakya Niti: नशीब बदलत नाही म्हणून निराश आहात? चाणक्य नीतीतील ‘या’ २ सवयी आजपासून अंगीकारा!

हरतालिकेची पूजा का करतात? एका क्लिकमध्ये वाचा व्रताचे महत्त्व!

SCROLL FOR NEXT