haj esakal
मराठवाडा

Haj Yatra 2024 : हज यात्रेसाठी राज्याला यंदा अतिरिक्त नऊ हजार जागा ; १९ हजार ६४९ भाविक जाणार ; २७ हजार २८३ जणांचे अर्ज

हज यात्रेसाठी महाराष्ट्राला मूळ १० हजार ५०९ भाविकांचा कोटा आहे. मात्र, देशातील इतर राज्यातून इच्छुक भाविकांचे कमी अर्ज आल्याने त्यांच्याकडील शिल्लक (सरप्लस) ९ हजार १४० जागा महाराष्ट्राला मिळाल्या असून २०२४ या वर्षात राज्यातून १९ हजार ६४९ भाविकांना हजला जाण्याची संधी मिळणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : हज यात्रेसाठी महाराष्ट्राला मूळ १० हजार ५०९ भाविकांचा कोटा आहे. मात्र, देशातील इतर राज्यातून इच्छुक भाविकांचे कमी अर्ज आल्याने त्यांच्याकडील शिल्लक (सरप्लस) ९ हजार १४० जागा महाराष्ट्राला मिळाल्या असून २०२४ या वर्षात राज्यातून १९ हजार ६४९ भाविकांना हजला जाण्याची संधी मिळणार आहे. या वर्षी देशात महाराष्ट्रातून सर्वाधिक २७ हजार २८३ इच्छुक असलेल्या भाविकांचे अर्ज आले आहेत.

२०२४ या वर्षात केंद्रीय हज कमिटीसाठी देशात एकूण १ लाख ४० हजार २० भाविकांचा कोटा आहे. त्यात महाराष्ट्राला मुस्लिम लोकसंख्येच्या प्रमाणात मूळ १० हजार ५०९ भाविकांचा कोटा देण्यात आला होता. त्यासाठी १५ जानेवारीपर्यंत भाविकांना अर्ज करण्याची संधी होती. देशभरातून यंदा १ लाख ७४ हजार ११७ भाविकांचे अर्ज आले. यात १ लाख ६२ हजार ५८५ भाविक हे सर्वसाधारण गटातील आहेत. तर ६ हजार ३७० भाविक हे ७० वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत. त्यांना थेट हजला जाण्याची संधी मिळेल.

उत्तर प्रदेश, बिहार, बंगालमधून अर्ज कमी

देशात मुस्लिम लोकसंख्येच्या प्रमाणात उत्तर प्रदेश, पश्‍चिम बंगाल, आसाम राज्यात सर्वाधिक जागा आहेत. मात्र यंदा तेथे इच्छुकांचे कमी अर्ज आले आहेत. यात उत्तर प्रदेश ११ हजार ४७८, पश्‍चिम बंगाल १४ हजार ३८, बिहारमधील १० हजार ४०३, आसाम ४ हजार ९३५, जम्मू काश्‍मीर २ हजार १० अशा एकूण ४४ हजार २३४ जागांसाठी अर्ज आलेले नाहीत. या राज्यांकडील शिल्लक जागा इतर राज्यांकडे वळविण्यात आल्या आहेत. ज्या राज्यातून इच्छुकांचे सर्वाधिक अर्ज आले त्या प्रमाणात या जागा देण्यात आल्या. यात महाराष्ट्राला पहिल्या टप्प्यात ८ हजार ९६१ तर दुसऱ्या टप्प्यात १७९ अशा एकूण ९ हजार १४० जागा अतिरिक्त मिळाल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचा मूळ आणि अतिरिक्त जागा मिळून सध्या कोटा हा १९ हजार ६४९ झाला आहे.

महाराष्ट्रातील भाविकांना मोठी संधी

राज्यात अर्ज केलेल्यांमध्ये ७० पेक्षा जास्त वय असलेल्या भाविकांची संख्या १ हजार ३०६ आहे. नियामानुसार त्यांचा हजला थेट नंबर लागला आहे. तसेच २५ हजार ८११ भाविक सर्वसाधारण वर्गातील आहेत. त्यामुळे आता प्रतिक्षा यातीत फक्त ७ हजार ६३४ भाविक राहतील. ज्या भाविकांचा नंबर लागला त्यांना मात्र काही अडचणींमुळे हजला जाता येणार नाही. त्यांच्या जागी प्रतिक्षा यादीतील भाविकांना संधी मिळेल. त्यामुळे यंदा राज्यातील भाविकांना हजयात्रा करण्याची मोठी संधी मिळाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोट्यवधींचा मालक असलेला गोविंदा सुनीतासोबत घटस्फोट झाल्यास किती देणार पोटगी? वेगळं होण्याचं नक्की कारण काय?

Kolhapur Violence : बाजूलाच सर्किट बेंच, वीज खंडित, प्रचंड गोंधळ, तलवारी, पोती भरून दगडं; अपुरी पोलिस यंत्रणा, कोल्हापुरात दोन गटातील राड्याचा घटनाक्रम असा...

Shubman Gill : शुभमन गिलची स्पर्धेतून माघार; ब्लड टेस्टनंतर फिजियोने BCCI ला पाठवला अहवाल अन्...

रात्रभर नोटा जाळत होता सरकारी इंजिनिअर तरी पैसे शिल्लक, छाप्यात सापडलं मोठं घबाड; कोट्यवधींच्या राखेसह रोकड जप्त

Vitamin D deficiency: व्हिटॅमिन डीची कमतरता असल्यास त्वचेवर दिसतात 'ही' 4 लक्षणे,करू नका दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT