file photo
file photo 
मराठवाडा

प्रशासनाला लागले माळेगाव यात्रेचे वेध

नवनाथ येवले

नांदेड : दक्षीण भारतात प्रसिद्ध श्री क्षेत्र माळेगाव खंडोबारायाची यात्रा मंगळवारी (ता.२४) होवू घातली आहे. जिल्हा परिषद प्रशासनाच्या नियंत्रनामध्ये यात्रास्थळावर भाविक, यात्रेकरुंना सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने राबवायच्या उपाय योजना, कृषी, पशु प्रदर्शना बाबत जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये शनिवारी (ता.३०) जिल्हापरिषद अध्यक्षा शांताबाई जवळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय बैठक संपन्न झाली.


जिल्हापरिषदेच्या नियंत्रणातील श्री क्षेत्र माळेगाव (ता. लोहा) यात्रा दक्षीण भारतात प्रसिद्ध आहे. बेलभंडारा उधळत खंडोबरायाला साकडे घालण्यासाठी राज्यासह परप्रांतातून भाविक श्री. क्षेत्र माळेगाव यात्रेत सहभागी होतात. यात्रास्थळावर भाविक, यात्रेकरूंना सुविधा पुरविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून निधीची तरतुद करण्यात येते.

पदाधिकारी उपस्थित

यात्राकालावधीत उपाय योजनांसह जिल्हापरिषदेच्या उपक्रमाच्या नियोजनार्थ मंगळवारी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शांताबाई जवळगांवकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे अयोजन करण्यात आले होते. उपाध्यक्ष समाधान जाधव, कृषी व पशुसंवर्धन सभापती दत्तात्रय रेड्डी, प्रभारी मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, उपमुख्यकार्यकारी अधिकारी नइम कुरेशी, व्हि. आर. कोंडेकर, जिल्हा परिषद सदस्या प्रणिता देवरे- चिखलीकर, चंद्रसेन पाटील, दशरथ लोहबंदे, रंगनाथ भुजबळ, पंचायत समिती (लोहा) सभापती सतिष उमरेकर आदी पदाधिकारी,सदस्य उपस्थित होते.

अधिकारीच दिड तास उशीरा बैठकीस हजर

प्रसिद्ध माळेगाव यात्रेच्या बैठकीचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासह सर्व आमदार, जिल्हा परिषद पदाधिकारी, सदस्यांना निमंत्रण देण्यात आल्याचे यावेळी व्हि. आर.कोंडेकर यांनी सांगीतले. बैठकीच्या पुर्व सुचना देणाऱ्या प्रशासनाचे अधिकारीच दिड तास उशीरा बैठकीस हजर झाले. या शिवाय समाजकल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी एस.व्हि. शिंगणे, बांधकाम उत्तरचे कार्यकारी अभियंता श्री. करपे यांच्या अनुपस्थिवर सभागृहात नाराजी व्यक्त करण्यात आली.

भरिव निधीची तरतुद करण्याची मागणी

यात्रास्थळावर  दरवर्षीच्या तुलनेत यंदा सुविधा पुरविण्यासह कृषी व पशुप्रदर्शनासाठी भरिव निधीची तरतुद करण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी यावेळी केली. दरम्यान गुरुवारी (ता.पाच) माळेगाव यात्रा नियोजनार्थ सर्वसाधारण सभेच्या सुचना प्रभारी मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी यांनी दिल्या.


पदाधिकाऱ्यांनी फिरवली पाठ:

श्री क्षेत्र माळेगाव यात्रेच्या बैठकीचे जिल्हा परिषद पदाधिकारी, सदस्यांना निमंत्रण देण्यात आले असताना समाजकल्याण सभापती शिला निखाते, शिक्षण व आरोग्य सभापती माधवराव मिसाळे, महिला व बालकल्याण सभापती मधुमती कुंटुरकर यांच्यासह आनेक सदस्यांनी बैठकीकडे पाठ फिरवली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Ocean : सगळ्यात वेगाने तापतोय हिंदी महासागर; ग्लोबल वॉर्मिंगचा अरबी समुद्राला बसणार मोठा फटका! भारताला किती धोका?

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींनी छत्रपती शिवाजी महाराज, राणी चन्नम्मांचा अपमान केला, बेळगावात मोदींचा घणाघात

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

SCROLL FOR NEXT