crime news crime news
मराठवाडा

'...पण मला कदाचित जगता आलं नाही', फेसबुक पोस्ट करत तरुणाची आत्महत्या

फेसबूकवर पोस्ट करत अहमदनगर-औरंगाबाद मार्गावर कागुनी फाट्याजवळ भरधाव एस.टी.समोर उडी मारून जीवन संपवल्याची घटना मंगळवार (ता.१७) सांयकाळी घडली

सकाळ वृत्तसेवा

-ज्ञानेश्वर बोरुडे

लोहगाव (औरंगाबाद): पैठण तालुक्यातील अमरापूरवाघुडी येथील रहिवासी अखिल भारतीय छावा युवक संघटना पैठण तालुका अध्यक्षाने आत्महत्या केली आहे. फेसबूकवर पोस्ट करत अहमदनगर-औरंगाबाद मार्गावर कागुनी फाट्याजवळ भरधाव एस.टी.समोर उडी मारून जिवन संपवल्याची घटना मंगळवार (ता.१७) सांयकाळी घडली. महेश कारभारी शिदे. (वय २३) असे तरुणाचे नाव आहे.

या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी, महेश शिंदे हा तरुण अमरापूरवाघुडी येथून मोटारसायकलने घरी कोणाला काहीही न सांगता मंगळवारी (ता.१७) सकाळी दहा वाजेदरम्यान बाहेर गावी निघून गेला. त्याने फेसबूक अकाउंटवर एक पोस्ट करत आत्महत्या करत असल्याचे सांगितले. ती पोस्ट पुढीलप्रमाणे-

'आयुष्य खूप छान आहे पण त्याचे जवळचे लोक sobat असतिल तर माझही आयुष्य खूप सुंदर होत ..पण मला कदाचित जगता आलं नाही मी माझ्या चुकीमुळे जगलो नाही...मला जगता आल नाही...khup प्रेमाचे लोक भेटले..माझे मित्र तर एवढे ना की.कोणाचा जीव घेतील मी म्हणलो तर...पण असो...माझ्या आयुष्यात..खूप त्रास आहे...जो मी konala sangu shakat nhi......pn mazi ek echha ahe mazya मृत्यु ला कोणालाही जबाबदार ठरवू नये... मी मझ्या त्रासामुळे मरतोय... माझ्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्या मझ्या जिवलागांना खूप खूप धन्यवाद... thank u so much all'

वरील फेसबूक पोस्ट करून सांयकाळी औरंगाबाद-जालना भरधाव एस.टी.बससमोर उडी घेवून आत्महत्या केली. स्थानिकांनी तत्काळ महेश यास जखमी अवस्थेत नेवासा ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. वैद्यकीय आधिकाऱ्यांनी तपासणी करून मयत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच छावाचे जिल्हाध्यक्ष किशोर शिरवत, किरण काळे, नातेवाईक संजय शिदे, आदी पदाधिकाऱ्यांनी धाव घेतली. दरम्यान दुपारी अमरापूरवाघुडी येथे मयत महेशवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT