Maratha Reservation Esakal
मराठवाडा

Manoj Jarange: मराठा आरक्षणानंतर धनगर, मुस्लीम आरक्षणासाठी लढणार; जरांगे म्हणाले, 'त्यांचाही प्रश्न सुटला पाहिजे पण...'

After Maratha reservation, Dhangar, Muslim will fight for reservation : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज किल्ले रायगडावर येत आहे. ते छत्रपती शिवाजी महराजांचा आशीर्वाद घेणार आहे. याआधी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

अंकिता खाणे (Ankita Khane)

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज किल्ले रायगडावर येत आहे. ते छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेणार आहे. मराठा आरक्षणासाठी केलेल्या आंदोलनाला यश मिळाल्यानंतर किल्ले रायगडावर मनोज जरांगे पाटील आशिर्वाद घेण्यासाठी जाणार आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. (Manoj Jarange on reservation)

गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे यांनी मराठ्यांना आरक्षण मिळाल्यानंतर धनगर, मुस्लीम त्यांच्यासाठी लढा देणार असं अनेकदा म्हटलं आहे. याबाबत आज माध्यमांशी बोलताना पत्रकारांनी प्रश्न केला असता जरांगे म्हणाले, आरक्षण हा मराठ्यांचा ज्वलंत प्रश्न आहे. हा आरक्षणाचा प्रश्न सुटला की, धनगर आणि मुस्लीम बांधवांना आरक्षण कसं देत नाहीत तेच बघतो.

त्यांचाही प्रश्न सुटला पाहिजे असं माझं मत आहे. पण, त्यांनीही म्हटलं पाहिजे हा प्रश्न सुटला पाहिजे. धनगर बांधव आणि मुस्लीम बांधव म्हणाला तर मग, मी पाहतो सरकार कसं आरक्षण देत नाही असं म्हटलं आहे.

मराठा आरक्षणासाठी आम्ही भांडत राहणार, बोलत राहणार आहे. ज्यावेळी मराठा समाजाच्या अध्यादेशाची अंमलबजावणी होईल तेव्हा गुलाल उधळला जाईल आणि महादिवाळी साजरी केली जाईल असं जरांगे यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT