hingoli photo 
मराठवाडा

दीड महिन्यानंतर मद्यपींची भागली हौस

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : जिल्ह्यात तब्बल दीड महिन्यानंतर गुरुवारी (ता. १४) दारू दुकाने उघडल्याने तळीरामांनी दारू खरेदीसाठी शहरातील रामलीला मैदानालगत असलेल्या वाईन शॉपवर एकच गर्दी केली. मात्र, परवानाधारक असेल तरच मद्य देणार असल्याचे विक्रेत्यांनी सांगितल्याने बहुतांश मद्यपींना आल्या पावली माघारी फिरण्याची वेळ आली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाउननंतर हिंगोलीत तब्बल दीड महिन्यानंतर पहिल्यांदाच मद्य विक्रीची दुकाने दिवसाआड उघडण्याचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिले आहेत. त्यानुसार गुरुवारी दुकाने उघडल्याने तळीरामांनी दारू खरेदी करण्यासाठी सकाळच्या सुमारास गर्दी केली. 

पोलिसांनी गर्दी आटोक्यात आणली

झालेल्या गर्दीचे फोटो व्हॉट्सॲपवर व्हायरल होताच पोलिसांनी धाव घेतली. यावेळी काही वेळ तळीरामांनी गोंधळ घातला. त्यामुळे पोलिसांनी गर्दी आटोक्यात आणली. शहरात दोन होलसेल वाईन शॉप असून केवळ एकच दुकान सुरू होते. प्रत्येक ग्राहक जमेल तेवढी जास्त मद्य नेण्याचा प्रयत्न केला. 

बॅरिकेट्सही बसविण्यात आले

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करीत दुकानात काम करण्यासाठी निरोगी मजुरांची निवड करण्यात आली होती. त्यांच्या हातात हँडग्लोज पाहावयास मिळाले. तसेच दुकानाच्या बाहेर सहा फूट अंतराचे गोल रिंगण आखण्यात आले होते. तसेच बॅरिकेट्सही बसविण्यात आले होते. गुरुवारी व शनिवारी दारू विक्रीला परवानगी दिली असून त्यानंतर पुन्हा जिल्हा प्रशासनाकडून नवीन आदेश काढले जाणार आहेत.

कळमनुरी, वसमत, बाळापुरात गर्दी

कळमनुरी : शहरातील मद्य विक्रीची दुकाने गुरुवारी (ता. १४) तब्बल दीड महिन्यानंतर उघडण्यात आली. या वेळी पोलिस बंदोबस्तात दारू विक्री करण्यात आली. ग्राहकांसाठी सॅनिटायझरची व्यवस्था करून इलेक्ट्रॉनिक थर्मामीटरद्वारे तपासणी केली जात होती. 

परवाना देण्याची व्यवस्था

देशी दारूच्या दुकानांवरून ग्राहकांना एका पेक्षा अधिक बॉटल घेण्याकरिता तत्काळ एक दिवसाचा मद्य पिणे अथवा बाळगण्याचा परवाना देण्याची व्यवस्थाही करण्यात आली होती. त्यामुळे अनेकांनी तत्काळ परवाना फीस भरून अधिकच्या मद्य बॉटल खरेदी करण्याला पसंती दिली. 

सकाळपासून मद्यपी रांगेत

दरम्यान, वसमत शहरातील मामा चौक परिसर व झेंडा चौक परिसरातील एक, अशा दोन दुकानांवरून मद्य विक्री सुरू होती. यासाठी सकाळपासून मद्यपी रांगेत उभे होते. आखाडा बाळापुरातही दारू खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. मात्र, औंढा नागनाथ शहरात मात्र मद्यपींनी दारू खरेदीकडे पाठ फिरविल्याचे चित्र पाहावयास मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT