संग्रहित छायाचित्र 
मराठवाडा

मराठवाडा भिजला, मोठ्या विश्रातीनंतर पाऊस

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद - मोठ्या विश्रातीनंतर पावसाने मराठवाड्यातील अनेक भागांत दमदार हजेरी लावली; पण काही भागांत फक्त रिमझिम पाऊस पडला. आठ जिल्ह्यांतील 421 मंडळांपैकी 16 मंडळांत शनिवारी (ता. 31) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत जोरदार पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस जालना जिल्ह्यात, तर सर्वांत कमी उस्मानाबाद जिल्ह्यात झाला. 

मागील अडीच महिन्यांपासून अपेक्षित पाऊस पडू शकला नाही; मात्र गेल्या दोन दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात सर्वदूर पाऊस होत आहे. शुक्रवारी सकाळपर्यंत औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यातील प्रत्येकी एका मंडळात जोरदार पाऊस झाला. वडीगोद्री मंडळात सर्वाधिक 102 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यापाठोपाठ पैठण मंडळात 74, उमापूर मंडळात 70 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. बहुतांश तालुक्‍यांकडे पाठ फिरविणाऱ्या पावसाची सार्वत्रिक व दमदार हजेरी मराठवाड्यात सर्वदूर लागावी, अशी अपेक्षा व्यक्‍त केली जात होती. विशेष म्हणजे पोळ्यानंतर पाऊस भोळा होतो, अशी म्हण प्रचलित आहे. त्यामुळे आता पुढे काय, असा प्रश्‍नही उपस्थित केला जाता होता; मात्र बैलपोळा फुटताच अनेक भागांत पाऊस बरसण्यास सुरवात झाली. औरंगाबाद जिल्ह्यात 22.70 मिलिमीटर पाऊस झाला असून, सर्वाधिक पाऊस हा औरंगाबाद तालुक्‍यात, तर सर्वांत कमी म्हणजे 6.50 मिलिमीटर पाऊस सिल्लोडमध्ये झाला. 

जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे 45.20 मिमी एवढा पाऊस झाला. त्यापाठोपाठ जालना 40, अंबड 40, भोकरदन 37.38 मिलिमीटर असा पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्‍यात सर्वाधिक 34.80 मिमी एवढा पाऊस झाला. 
हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्‍यात सर्वाधिक 41 मिलिमीटर पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्‍यात सर्वाधिक म्हणजे 60.63, तर भोकरमध्ये केवळ 2.75 मिलिमीटर पाऊस झाला. बीड जिल्ह्यात वडवणी येथे सर्वाधिक 36 मिलिमीटर एवढा पाऊस झाला. लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्‍यात 49.80 एवढा पाऊस झाला; तर उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा येथे सर्वाधिक 54 मिलिमीटर पाऊस झाला. 
  
उस्मानाबादमधील चार तालुके कोरडेच 
उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब, भूम, वाशी आणि परंडा तालुक्‍यात काहीच पाऊस झाला नसल्याची नोंद झालेली आहे. नाही म्हणायला कळंब, भूममध्ये काही सरी कोसळल्या; पण त्यात जोर नव्हता. 
 
या ठिकाणी झाला दमदार 
औरंगाबाद तालुक्‍यामधील चित्तेपिंपळगाव (80 मिमी), वैजापूर तालुक्‍यातील गारज (80 मिमी), जालना तालुक्‍यातील जालना (75 मिमी), पाचनवडगाव (70 मिमी), भोकरदन तालुक्‍यातील भोकरदन (77 मिमी), राजूर (79 मिमी), अंबड तालुक्‍यातील गोंदी (70 मिमी), परभणी जिल्ह्यातील परभणी तालुक्‍यामध्ये असलेल्या झरी बुद्रुक (83 मिमी), नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्‍यामधील कुरुला (70 मिमी), उस्माननगर (80 मिमी), फुलवळ (80 मिमी), लोहा तालुक्‍यातील कलंबर (92 मिमी), कापशी (79 मिमी), बीड जिल्ह्यातील बीड तालुक्‍यामधील पिंपळनेर (95 मिमी), लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्‍यामधील शेळगाव (72 मिमी), तर उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्‍यातील नारगवाडी (77 मिमी) मिलिमीटर पाऊस झाला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माेठी बातमी! 'जुन्या थकीत कर्जदारांना दिलासा नाही'; जिल्हा बँकेचा शासनाकडे प्रस्ताव, माेठे अपडेट आले समाेर..

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

Latest Marathi News Updates : पन्हाळगडाचा जागतिक वारसा यादीत समावेश, कोल्हापूरसाठी गौरवाचा क्षण - पालकमंत्री प्रकाश आबिटकर

छत्रपती शिवरायांचा इतिहास जगभर पोहोचणार, UNESCO यादीत पन्हाळगडाचा समावेश; पालकमंत्र्यांनी 'या' घटनेची करुन दिली आठवण

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

SCROLL FOR NEXT