Sowing In Latur District
Sowing In Latur District 
मराठवाडा

लातूर जिल्ह्यात तीन वर्षांत पहिल्यांदाच जूनमध्ये पेरणीला सुरवात, वाचा

हरि तुगावकर

लातूर : लातूर जिल्ह्यात जून अखेर किंवा जुलैमध्येच पाऊस पडत असल्याने जूनमध्ये खरीपाची पेरणी होत नाही. गेल्या तीन वर्षात जुलैमध्येच खरीपाची पेरणी झालेली आहे. पण या वर्षी जूनच्या सुरवातीपासून दमदार पाऊस पडत आहे. त्यामुळे तीन वर्षात पहिल्यांदा खरीपाची पेरणी होत आहे. जिल्ह्यात खरीपाचे क्षेत्र सहा लाख १२ हजार हेक्टर आहे. या पैकी ९७ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून याची टक्केवारी १५.८६ इतकी आहे. गेल्या काही दिवसात पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे जिल्ह्यात पेरण्यांनी वेग घेतला आहे.


लातूर जिल्ह्यात जूनमध्ये फारसा पाऊस पडत नाही. कधी जूनमध्ये सुरवातीला पाऊस झाला तर नंतर मात्र मोठी उघडीप राहते. त्यामुळे जूनमध्ये पेरण्या होत नाहीत. पण यावर्षी जूनच्या सुरवातीपासूनच जिल्ह्यात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. जिल्ह्यात सरासरी शंभर मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्यास सुरवात केली आहे. जिल्ह्यात सहा लाख १२ हजार हेक्टर पेरणी योग्य क्षेत्र आहे. त्या पैकी आतापर्यंत ९७ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. याची टक्केवारी १५.८६ इतकी आहे.

जिल्ह्यात खरीपात ज्वारीचे क्षेत्र ६२ हजार २२९ हेक्टर असून त्यापैकी एक हजार ७२९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. याची टक्केवारी २.७८ इतकी आहे. तुरीचे क्षेत्र एक लाख ११ हजार हेक्टर असून त्या पैकी तेरा हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. ही ११.७१ टक्के इतकी ही पेरणी आहे. जिल्ह्यात सर्वाधिक सोयाबीन तीन लाख ९१ हजार २९२ हेक्टर क्षेत्र असून या पैकी ७२ हजार ९३४ हेक्टर व पेरणी झाली आहे. याची टक्केवारी १८.६४ इतकी आहे. गेल्या काही दिवसात जिल्ह्यात दररोज कमी अधिक प्रमाणात पाऊस होत आहे. त्यामुळे सर्वच तालुक्यात शेतकऱयांची पेरणी करण्यासाठी लगबग सुरु आहे.

लातूर : आरटीई प्रवेशाला अखेर हिरवा कंदील, पालकांना मिळाला दिलासा

लातूर जिल्ह्यात तालुकानिहाय झालेल्या पेरण्या हेक्टरमध्ये पुढील प्रमाणे आहेत
तालुका------------एकूण पेरणी क्षेत्र-----पेरणी झालेले क्षेत्र-----पेरणीची टक्केवारी
लातूर-------------७१,५२६.८५----------१७८१.००----------२.४९
औसा------------१,०५,८८०-------------९,९०४.००----------९.३५
अहमदपूर----------८०,१५८.४८-----------२५,४३५.००---------३१.७३
निलंगा-------------९७,३१०.८८ ----------१९,६०७.००----------२०.१५
शिरुर अनंतपाळ-----२८,५००.००------------९७५.००-------------३.४२
उदगीर------------६२,८९१.००-------------८,९८८.००------------१४.२९
चाकूर---------------५६,८३६.७५---------------७,९९९.००---------------१४.०७
रेणापूर---------------४६४,०३२.५२------------१,७५८.००-------------३.८२
देवणी---------------३५,२५३.९०---------------१३,६३५.००---------------३८.६८
जळकोट---------------२८.०३०.९०---------------७,०४१.००---------------२५.१२
एकूण---------------६,१२,४२१.२८---------------९७,१२३.००---------------१५.८६

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT