Rain Damaged Onions In Paranda Block 
मराठवाडा

परंडा तालुक्यात पुन्हा पावसाला सुरवात, कांद्याचे मोठे नुकसान

आनंद खर्डेकर

परंडा ( जि.उस्मानाबाद)  : एक दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाला पुन्हा तालुक्यात सुरवात झाली असून रविवारी (ता.१८) दुपारी परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसामुळे शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले. सर्वच राजकीय पक्षांचे नेते पाहणी दौऱ्यावर येत असताना पाऊसही पुन्हा दौऱ्यावर आल्याचे चित्र आहे. मागील काही दिवसांपासून तालुका परिसरात दमदार पाऊस सुरू असल्याने तालुक्यातील सीना-कोळेगाव, चांदणी, खासापुरी, पांढरेवाडी हे प्रकल्प ओसंडून वाहत होते.

अनेक पाझर तलाव तुडूंब भरले, तर खंडेश्वरवाडी, काळेवाडी हे प्रकल्प फोडून पाणी सोडून द्यावे लागले. एकाच दिवशी १७० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्याने शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हाती आलेले पिक वाया गेले. धरणे भरल्यानंतर झालेल्या पावसामुळे सर्वच नदी-नाले खळाळून वाहत आहेत.

एक दिवसाच्या विश्रांतीनंतर रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सोनारी, डोणजा, मुगाव, देऊळगाव परिसरात जोरदार पाऊस झाल्याने अनेकांच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाले. अनेकांच्या शेतात काढून ठेवलेल्या कांद्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले. या पावसाचा फटका तुरीच्या पिकालाही बसला आहे. तुरीचे उत्पादन घटण्याचा धोकाही वाढला आहे. या पावसामुळे नळी, खैरी या नद्याही दुथडी भरून वाहत आहेत. पाहणी दौऱ्यावर येणाऱ्या सर्व नेत्यांकडून शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा आहेत.


संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs DC मॅचमध्ये राडा! मैदानात खेळाडूंमध्ये बाचाबाची अन् स्टँड्समध्ये चाहत्यांची तुफान हाणामारी; Video Viral

Unseasonal Rain : उरुळी कांचनसह परिसराला गारांसह अवकाळी पावसाने झोडपले; विद्युत खांब, झाडांची पडझड, गहू व कांदा पिकाचे मोठे नुकसान

Latest Marathi News Live Update : जैकांदिवली – चारकोपमध्ये गॅस सिलिंडर उपलब्ध नसल्याने लोक संतप्त

सगळे दिसले पण हनुमान कुठेय? 'रामायण' टीझरमध्ये हनुमान न दिसल्याने प्रेक्षक चकीत; हे आहे कारण

Crime: भावजयचे दिरासोबत अनैतिक संबंध, जाऊबाई संतापली, भर पंचायतीत ॲसिडची बाटली आणली अन्...; धक्कादायक कृत्य

SCROLL FOR NEXT