farmers
farmers 
मराठवाडा

पैनगंगा नदीपात्रात विदर्भ-मराठवाडयातील शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन 

अरविंद ओझलवार

उमरखेड : मागील चार महिन्यापासून नपावसात खंड पडल्याने तसेच परतीच्या पावसाने दगा दिल्याने पैनगंगा नदी कोरडी पडली आहे. यामुळे नदीपात्राच्या काठावर वसलेल्या विदर्भ व मराठवाड्यातील नव्वद गावातील नागरिकांसमोर पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. तसेच नदीपात्राशेजारील हजारो हेक्टर शेतजमीनीचे सिंचन रखडल्याने रब्बी हंगाम धोक्यात आला आहे.

पैनगंगा नदीवरील ईसापुर धरणात मुबलक पाणीसाठा असतांना नदीत पाणी नसल्याने त्रस्त झालेल्या नव्वद गावातील शेतकऱ्यांनी नदीला तिसरा कालवा जाहीर करून त्वरीत पाणी सोडण्यात यावे या मागणीसाठी कोरडया नदीपात्रात आज (ता.19) पासुन शेकडो शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले आले आहे. जोपर्यंत मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत लढा देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

ईसापूर धरणातून रोटेशननुसार उजवा व डावा कालव्यात पाणी सोडताना नदीपात्रात सहस्रकुंड पर्यन्त तत्काळ पाणी सोडण्यात यावे, ईसापुर डावा कालवा व कयाधु शाखा कालव्याचे पुर्नजीवन करुन टेलपर्यन्त अस्तरीकरण करण्यात यावे, पैनगंगा नदीला तिसरा कालवा घोषीत करावा, विदर्भातील 42 व मराठवाड्यातील 48 गांवाच्या नदी काठावरील शेतीचे उभ्या पिकांचे पंचनामे करुन नुकसानभरपाई देण्यात यावी, नदीचा नैसर्गिक प्रवाह कायम स्वरुपी ठेऊन शेतकऱ्यांना बारमाही सिंचनासाठी पाणी देण्यात यावे इत्यादी मागणी साठी धरणे आंदोलन सुरू करण्यात आले असुन दरवर्षी नदीपात्रात पाणी सोडण्यासाठी विविध प्रकारे आंदोलन करावे लागत असुन यातुन कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी या वेळी विदर्भ व मराठवाडयातील नव्वद गावातील लोकांनी कोरडया नदीपात्रात सुरू केलेल्या या ऐतीहासीक धरणे आंदोलनाने प्रशासना समोर आव्हान उभे केले आहे.

या धरणे आंदोलनास माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, बाबुराव कदम कोहळीकर, जिप सदस्य चितंगराव कदम, पं स सभापती प्रविण पाटील मिरासे, कृष्णा पाटील देवसरकर, कॉग्रेस तालुकाध्यक्ष दत्तराव शिंदे, सुदर्शन माने बोरी, बंटी माने चातारी, तुकाराम माने बोरी, बापुराव माने सिंदगी, दत्तराव पतंगे मानकेश्वर, चक्रधर देवसरकर कोप्रा, श्रीधर देवसरकर यासह अनेकांनी मार्गदर्शन केले. सदर आंदोलनाची तीव्रता बघता उमरखेड व हिमायतनगर पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला होता. दरम्यान दोन दिवसात पाणी न सोडल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT