File photo
File photo 
मराठवाडा

तुरीच्या रकमेचा घोळ कायम 

सकाळ वृत्तसेवा

कळंब (जि.उस्मानाबाद) ः येथील शासकीय हमीभाव खरेदी केंद्रावर नाफेड व खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातून 2017-18 मध्ये तूर खरेदी करण्यात आली होती. तूर खरेदीची हेक्‍टरी 10 क्विंटलची मर्यादा होती. मात्र मर्यादेपेक्षा अधिक खरेदी केलेल्या तुरीचा हिशेब जुळत नाही. संबंधित यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांकडून हेतुपुरस्सर मर्यादेपेक्षा अधिकची खरेदी करण्यात आलेल्या तुरीची "लॉट एंट्री' (खरेदी) त्रयस्थाच्या नावे दाखविण्यात आली. त्यामुळे मर्यादेपेक्षा जास्त खरेदी करण्यात आलेल्या तुरीच्या पैशापासून शेतकरी अद्यापही वंचित आहेत. दरम्यान, खरेदी-विक्री संघाकडे पैशासाठी शेतकरी चकरा मारत आहेत. 


तूर खरेदीचे पैसे मिळाले नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी जिल्हा निबंधक सहकारी संस्था यांच्याकडे केल्या आहेत. चीैकशी करण्याचे आदेश जिल्हा निबंधकांकडून सहायक निबंधकांना देण्यात आले असून, अद्यापही चौकशी गुलदस्त्यात आहे. 
2017-18 मध्ये शासनाने हमीभाव खरेदी केंद्र सुरू केले होते. या केंद्रावर नाफेड व खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातून सोयाबीन व तूर खरेदी करण्यात आली होती. एकूण तूर खरेदी करण्यात आल्याचा हिशेब जुळला असून, शासनाकडून पैसेही शेतकऱ्यांना मिळाले आहेत.

शेतकऱ्यांना प्रतिहेक्‍टरी 10 क्विंटल तूर खरेदी करण्याची मर्यादा शासनाने घातली होती. मात्र खरेदी-विक्री संघाने दहा क्विंटलपेक्षा अधिक तूर खरेदी केली होती. खरेदी-विक्री संघाकडून शेतकऱ्यांना पावत्याही देण्यात आल्या. पण 10 क्विंटलपर्यंतच शेतकऱ्यांना पैसे मिळाले. उर्वरित तूर खरेदीचे पैसे शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत मिळाले नाहीत, असे शेतकऱ्यांनी सांगितले. ही रक्कम जवळपास 30 ते 40 लाखांच्या घरात असल्याचे सूत्रांनी सांगितले. मर्यादेपेक्षा अधिक खरेदी केलेली तूर ही त्रयस्थ शेतकऱ्यांच्या नावे खरेदी केल्याचे (लॉट एंट्री) खरेदी-विक्री संघाकडून दाखविण्यात आले. खरेदी दाखविण्यात आलेल्या शेतकऱ्यांना पैसेही मिळाले. तुरीच्या एकूण खरेदीप्रमाणे शासनाकडून शेतकऱ्यांना पैसे देण्यात आले आहेत. मात्र अनेक शेतकरी लाभापासून वंचित आहेत. 

खरेदी-विक्री संघाच्या घोळामुळे काही शेतकऱ्यांना जास्तीचे पैसे गेले आहेत; मात्र अनेक शेतकरी पैशापासून वंचित आहेत. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. 
- बी. एस. कटकधोंड, सहायक निबंधक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT