Agriculture officials disappear while selling seeds at higher prices to farmers Panchnama  sakal
मराठवाडा

Farmer News : शेतकऱ्यांची लूट होत असताना कृषी अधिकारीच गायब

शेकापने केला खुर्चीचा पंचनामा; हरवल्याची नोटीस चिटकवून दिल्या घोषणा

सकाळ वृत्तसेवा

माजलगाव : खरिपाची पेरणी तोंडावर आली असल्याने अनेक कृषी दुकानदार कपाशीच्या काही वाणाचे बियाणे चढ्या भावाने विकून शेतकऱ्यांची लूट करीत आहेत. हे सुरू असताना दुसरीकडे कृषी अधिकारीच कार्यालयातून गायब झाल्याने कोणाकडे दाद मागायची असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे.

यामुळे शेतकरी कामगार पक्षाने सोमवारी (ता.१२) कृषी कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्चीचा पंचनामा करत कृषी अधिकारी गायब झाल्याची नोटीस चिटकवून घोषणा दिल्या. मॉन्सून महाराष्ट्रात दाखल झाल्याची बातमी हवामान खात्याने दिली असल्याने शेतकरी खरिपाच्या पेरणीची लगबग करत आहे.

कपाशी लागवडीसह सोयाबीन, मुग, तूर, उडीद आदींच्या पेरणीसाठी बियाण्याच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांची मोंढ्यात गर्दी होत आहे. याचाच गैरफायदा घेत काही कृषी दुकानदार कपाशीचे काही ठरावीक वाण तसेच सोयाबीनच्या काही वाणाची चढ्या भावाने विक्री करून शेतकऱ्याची लूट करीत आहे.

दिवसाढवळ्या शेतकऱ्यांची लूट होत असताना त्यांच्यावर अंकुश ठेवणारे तालुका कृषी अधिकारी शिवप्रसाद संगेकर मात्र मागील चार दिवसांपासून गायब असल्याचा आरोप शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

चार दिवसांपासून कृषी अधिकारी संगेकरांचा संपर्क होत नसून ते कार्यालयातही हजर राहत नाहीत. यामुळे चिडलेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी थेट कृषी कार्यालयावर धडक देत घोषणाबाजी केली.

यावेळी कृषी अधिकारी कार्यालयात हजर नसल्याचे पाहून त्यांनी रिकाम्या खुर्चीचा पंचनामा केला. कृषी अधिकारी संगेकर हरवल्याची नोटीस त्यांच्या रिकाम्या खुर्चीला चिटकवून घोषणाबाजी केली. या आंदोलनात शेतकरी कामगार पक्षाचे नेते ॲड. नारायण गोले पाटील, मुंजा पांचाळ, श्री. शेळके,

परमेश्वर डाके शेतकरी संघटनेचे सतीश रिंगणे, अण्णासाहेब मस्के, तुकाराम नवघरे आदी सहभागी झाले होते. कृषी दुकानदारांकडून शेतकऱ्यांची होणारी लृट येत्या दोन दिवसांत थांबवली नाही, चढ्या भावाने बियाणे विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली नाही तर, कृषी अधिकाऱ्याची धिंड काढण्याचा इशारा यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे ॲड. नारायण गोले पाटील यांनी दिला.

संगेकरांविरुद्धच्या तक्रारी नित्याच्याच

तालुका कृषी अधिकारी नेहमीच कार्यालयात गैरहजर राहतात, त्यांना संपर्क केल्यास ते कधीच फोन उचलत नाहीत. कृषी कार्यालयात गेलेल्या शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक देतात. शिवप्रसाद संगेकरांच्या विरुद्ध अशा प्रकारच्या तक्रारी या नित्याच्याच झाल्या असल्याचे उपस्थित शेतकऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Department : गुन्हेगारी कमी कशी व्हायची? मोक्का रद्द करतो, गुन्हेगारांच्या टोळीकडे पोलिसानेच मागितले ६५ लाख; सहाय्यक फौजदार निलंबित

दुर्मीळ घटना! नवजात बाळाच्या पोटात आढळला दुसरा गर्भ; जगभरात फक्त 200 प्रकरणांमध्ये नोंद, काय म्हणाले डॉक्टर?

Latest Marathi News Live Update : चंद्रकांत पाटलांना जाब विचारणार, घायवळ प्रकरणावरून रवींद्र धंगेकर आक्रमक

Solapur News: 'मूर्तिकारांच्या अतिक्रमित २० झोपड्या जमीनदोस्त'; महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक, मंडई विभागाची संयुक्त कारवाई

Pune News : बळकावलेल्या जमिनींपासून बंदूकीच्या गोळ्यांपर्यंत! पुणे पोलिसांनी निलेश घायवळभोवती आवळला फास, घरावर छापेमारी, हाती लागलं मोठं घबाड

SCROLL FOR NEXT