Ajit Pawar Beed Sabha 
मराठवाडा

Ajit Pawar Beed Sabha: "धनंजय मुंडेंबाबत कोण काय बोलून गेलं पण..."; बीडमधील सभेत अजित पवार काय म्हणाले?

Sandip Kapde

Ajit Pawar Beed Sabha:  शरद पवार यांच्या १७ तारखेच्या सभेला उत्तर देण्यासाठी आज बीड येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर सभा घेतली. या सभेत शरद पवार गटावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. अजित पवार यांनी सरकारच्या योजनांची माहिती सभेत दिली.

अजित पवार म्हणाले, बीडकरांनी ठरवलं तर ते काय करु शकतात हे आज सिद्ध झालं. समाजकारण आणि राजकारणाची सांगड कशी घालायची हे बीडकरांना चांगल माहित आहे. राजकारणात कोणी कुणाचा शत्रू आणि मित्र नसतो. संतांचे आशिर्वाद घेण्यासाठी मी आलो आहे. संतांनी दावलेला समतेचा मार्ग महाराष्ट्रसाठी दिशा देणार आहे.

प्रत्येकाच्या जिवनात राजकीय चढ-उतार येत असतात. त्यांना सामोरे जाऊन पुढे जायचे असते. मला महाराष्ट्राला सांगायचे जातीय सलोखा राहीला पाहीजे. हे राज्य आपलं आहे. आम्ही आमचं काम कृतीतून दाखवायचे आहे. केंद्राच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवायच्या असतात. महायुतीत राहून जनतेचं भलं करायचं आहे. बीडमध्ये नेहमी पीक विम्याचा मुद्दा समोर येत असतो. आता १ रुपयात वीमा काढता येणार आहे, सरकारवर साडेचार हजार कोटी रुपयाचा बोजा आला पण सहन करतोय, असे अजित पवार म्हणाले.

अजित पवार म्हणाले, विरोधक दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असतात. कांदा प्रश्नावर धनंजय मुंडे यांनी बीडला जाण्यास सांगितले. सत्ता ही सर्वसामान्यांसाठी असते. शेतकऱ्यांना जेवढं देता येईल तेवढं देण्याचा निर्णय घेतला. २ लाख टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला.

देशात आज मोदींचा करिष्मा आहे. ५ ट्रिलीयन डॉलरची अर्थव्यवस्था आपल्याला करायची आहे. जगभरात चांद्रयान मोहिमेचे कौतुक होत आहे. बीड राजकीय मैत्री जपणारा जिल्हा आहे. शत्रुत्व इथं कधी दिसलं नाही. विलासरा देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांनी मैत्री जपली होती, असे अजित पवार म्हणाले.

आम्ही पदं मिरवण्यासाठी घेतलेली नाहीत. जनतेचा पैसा योग्य ठिकाणी वापरता आलं पाहिजे. सहा लाख कोटींचं बजेट मी सादर करणार आहे. त्यात बीडकरांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेल, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.

धनंजय मुंडे हे पोटतिडकीने बोलतो. पण काही लोकांनी त्यावर टीका केली. मुंडे यांच्याबाबत कोणी काय बोलून गेलं पण आम्हाल त्यात पडायचं नाही.  आम्ही उगीच अधिकाऱ्यांना त्रास देत नाही. काम करणाऱ्यांच्या मागे उभे राहतो आणि काम न करणाऱ्यांचा बंदोबस्त करतो. धनंजय मुंडे संकटाला कधी घाबरले नाहीत. एक आदर्श विधानपरिषेदाचा नेता म्हणून त्यांची इतिहासात ओळख आहे. ३२ हजार फरकाने ते २०१९ ला निवडून आले, असे पवार म्हणाले.

राजकारणात प्रत्येकाचा काळ असतो. नवीन फळी तयार करायचे असते. मी निवडणुकीपुर्ती अश्वासने देणार नाही. आम्हाला राजकारणात ३०-३५ वर्षे झाली. शेतकरी हीच माझी जात आहे. बीड जिल्ह्याचा पालकमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल, यासाठी मी प्रयत्न करणार आहे. सगळ्या जिल्ह्यांना मी न्याय देणार आहे. विकासासाठी आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये आलो असल्याचे पवार म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur : शेतकऱ्यानं म्हशी घ्यायला ७ लाख साठवले, सहावीत शिकणाऱ्या लेकानं गेमवर ५ लाख उडवले; बँक स्टेटमेंट बघून बसला धक्का

Weekly Astrology 7 to 13 July 2025: या आठवड्यात कोणत्या राशींना होणार आर्थिक लाभ अन् नोकरी व्यवसायत मिळेल उत्तम संधी, वाचा साप्ताहिक राशिभविष्य

Latest Maharashtra News Updates : मुंबईत वाहतूक ठप्प! मोनो रेल सेवा बंद, मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाडाने प्रवाशांचे हाल

Global Club Championship: पाकिस्तानला डावलण्याची शक्यता; जागतिक क्लब अजिंक्यपद स्पर्धा : पाच संघांचा सहभाग

CA Result Success Story: रोज आठ ते दहा अभ्यासात जीव ओतून जिद्द व चिकाटीच्या जोरावर गेवराईच्या पृथ्वीराजचे 'सीए'परीक्षेत यश

SCROLL FOR NEXT