Ajit Pawar esakal
मराठवाडा

'मी ऐकत नाही खरं, पण...' असं म्हणत सासुरवाडीपुढे अजित पवार झुकले

कोरोना सुरु झाल्यापासून आपण अनेकांना मास्कशिवाय पाहिलेले नाही.

सकाळ डिजिटल टीम

बीड : कोरोनाचे (Corona Pandemic) संकट सुरु झाल्यापासून आपण अनेकांना मास्कशिवाय पाहिलेले नाही. त्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचादेखील समावेश आहे. अनेक सभांमध्ये उपस्थितांनी जरी मास्क घातलेला नसला तरी, अजित पवारांनी कधीच मास्क काढून भाषण केले नाही. मात्र, तब्बत दोन वर्षांच्या कालावधीनंतर अजित पवारांनी चक्क मास्क काढत भाषण केले आहे. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.अजित पवार सध्या बीड दौऱ्यावर आहेत. (Ajit Pawar Removes His Mask)

त्याचे झाले असे की, अजित पवार बीड (Beed) दौऱ्यावर असून तेथील आयोजित एका कार्यक्रमात ते बोलण्यासाठी म्हणून उभे राहिले. त्यावेळी उपस्थितांनी अजित पवारांना मास्क काढून बोलण्याचा आग्रह धरला. त्यावेळी आपण मास्क काढण्यासाठी कुणाचे ऐकत नाही, मात्र मराठवाडा आपली सासूरवाडी असल्याने ऐकावं लागतं असं म्हणत अखेर अजित पवार यांनी मास्क काढू बोलतो अशी मिश्कील टिपण्णी केली. अजित पवार यांनी तब्बल दोन वर्षांनंतर मास्कशिवाय भाषण केल्याने उपस्थितांना चांगलाचा आश्चर्याचा धक्का बसला असून, सध्या अजित पवार यांच्या मास्कशिवाय भाषणाची सगळीकडेच जोरदार चर्चा रंगली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Heritage status: शिवरायांच्या किल्ल्यांना 'युनेस्को'चा दर्जा मिळण्यास का लागतोय वेळ? गडांच्या व्यवस्थापनावर समितीने ठेवलं बोट

Mumbai News: जैन मंदिरावरील कारवाई योग्यच, उच्च न्यायालयाने ट्रस्टचे अपील फेटाळले

Thane News: ठाण्यात उभी राहणार ग्रीनवॉल! पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाचा निर्णय

Mumbai News: नागरिकांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका, वेसावे ते भाईंदर कोस्टल रोडच्या कामाला वेग

Latest Maharashtra News Live Updates: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT