file photo 
मराठवाडा

नांदेडात अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद

प्रल्हाद कांबळे

नांदेड : येत्या पौष पौर्णिमेस ता. १० व ११ जानेवारी रोजी प. पू. भदंत धम्मसेवक महाथेरो यांच्या अध्यक्षतेखाली महाविहार बावरीनगर, दाभड (नांदेड) येथे संपन्न होणाऱ्या ३३ व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. रविवार (ता. पाच) जानेवारीस सभामंडपाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शांताबाई जवळ्गावकर यांच्या हस्ते पार पडला. 

बौद्ध धम्म परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी सोमवार (ता. सहा) जानेवारीला जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेऊन होणा-या कामांचा आढावा घेतला. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पार पडणा-या या परिषदेत दरवर्षी तीन ते चार लाख श्रद्धावान उपासक- उपासिका उपस्थित राहत असतात. या सर्व उपासकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय हौऊ नये, याकरीता जिल्हा प्रशासन आवश्यक ती खबरदारी घेत आहे. 

विदेशातील भन्तेंची उपस्थिती   

धम्म परिषदांची जन्मभूमी म्हणून मान्यता पावलेल्या महाविहार बावरीनगर येथे होणा-या ३३ व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेला देशातीलच नव्हे तर श्रीलंका तथा नेपाळ येथुन पू. भिक्खु संघ उपस्थित राहणार आहे. या दोन दिवसीय धम्म परिषदेचे उद्घाटन श्रीलंका येथील पू. भदंत दोडंगपहाल सुगूण महाथेरो यांच्या हस्ते तर धम्म ध्वजारोहन पू. भदंत सद्धालोका महाथेरो, श्रीलंका यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. धम्म परिषदेनिमित्त दरवर्षी प्रकाशित होणा-या ‘संबोधी २०२०’ चे प्रकाशन पू. भदंत उदयभद्र थेरो, नेपाळ यांच्या हस्ते होणार आहे.  

धम्म प्रवचन, सामुहीक मंगल परिणय

बौद्ध जीवन मार्ग, जातक कथाएँ एवं बौद्ध धम्म, अष्टांगिक मार्ग आदी विषयांवर देश- विदेशातील  पू. भिक्खू संघाद्वारे धम्म प्रवचने होणार आहेत. तद्वतच वधू- वर परीचय मेळावा, सामुहीक मंगल परिणय, व्यसनमुक्ती प्रतिज्ञा, धम्मज्ञान चाचणी स्पर्धेतील विजयी मुलांना पुरस्कार ईत्यादी कार्यक्रम होणार आहेत.
या धम्म परिषदेच्या निमित्ताने गरजूंसाठी मोफ़त आरोग्य शिबीर तसेच इतर प्रासंगिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. धम्म परिषदेतील या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन परिषदेचे संयोजक डॉ. एस. पी. गायकवाड यांनी केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT