accident news 
मराठवाडा

वडिलांना किराणा सामान घेऊन जाणाऱ्या मुलाला भरधाव बसची धडक; बसचालक पसार

बाबासाहेब गोंटे

अंबड (जालना): सालदार वडिलांसाठी किराणा सामान घेऊन मोटरसायकलवर जात असताना अंबडकडून जालन्याच्या दिशेने जाणार्‍या भरधाव बसने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात युवक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात झालेल्या तरुणाचे नाव संदिप (संजय) अरुण शिंदे (वय 17वर्षे) इंदेवाडी (ता.जालना ) असे आहे. सकाळी साडेनऊच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली.

याविषयी अधिक माहिती अशी की, काही सामान घेऊन अंबडच्या दिशेने शेताकडे सदर युवक निघाला असता त्यास अंबडकडून जालन्याच्या दिशेने जाणार्‍या बीड अकोला या बसने(एम. एच 40 ए.क्यु - 6134) ने जोराची धडक दिल्याने मोटर सायकल (एम 21 ए - 7358) वरील संजय शिंदे यांच्या डोक्याला व पायाला गंभीर इजा झाल्याने तो जागेवरच बेशुद्ध पडला. बस चालक तेथून फरार झाला.

गंभीर जखमी युवकास तात्काळ मठपिंपळगाव येथील  जगदीश जिगे ,संदिप डावखर यांनी ग्रामस्थांच्या मदतीने गाडीत टाकून प्रथम जालना येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले. परंतु तब्येत सिरीयस असल्याने नंतर खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातनंतर रस्त्यावर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. पोलिसांना या बाबत कळविण्यात आले होते.

(edited by- pramod sarawale)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Makar Sankranti Horoscope 2026: आता प्रतीक्षा संपली... यंदाच्या मकर संक्रांतीपासून 'या' राशींचे सुरू होणार सुवर्णदिवस; तुमचं काय होईल?

Mumbai Municipal Election : मराठी मतदारांचा कौल कुणाला? सर्वपक्षीयांचा व्होट बँक शाबूत ठेवण्याचा प्रयत्न

DMart मध्ये संक्रांती स्पेशल सेल! 99 पासून लेडिज ड्रेस अन् 199 मध्ये पुरूषांच्या कपड्यांचे सेट, कोणत्या कपड्यांवर किती डिस्काउंट पाहा

Nitin Gadkari: राजकारण नाही, समाजकारण माझा आत्मा: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी; जो मत देईल, न देईल दोघांचेही काम करतो!

कुत्रा चावल्यानं मृत्यू किंवा जखमी झाल्यास...; नुकसान भरपाईबाबत सर्वोच्च न्यायालयाची मोठी टिप्पणी

SCROLL FOR NEXT