Ambadas Danve Esakal
मराठवाडा

Ambadas Danve: 'ये साजिशों का दौर है..', दानवेंना नेमकं स्टेट्सच्या माध्यमातून नेमकं सांगायचंय काय?

Ambadas Danve: गेल्या दहा वर्षांपासून लोकसभेच्या तिकीटाची प्रतीक्षेत असणारे अंबादास दानवे पुन्हा एकदा मागे राहिले, त्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

अंकिता खाणे (Ankita Khane)

Ambadas Danve: राज्यासह देशात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांची जाहीर करण्यास सुरूवात झाली आहे. आज सकाळी शिवसेना ठाकरे गटाने आपल्या १७ उमेदवारांची नावे जाहीर केली आणि पक्षातील इतर इच्छुक उमेदवार नाराज झाल्याची चर्चा सुरू झाली. ''माझ्या नशिबात लोकसभा आहे, मला ज्योतिषांनी सांगितलंय'' असं सांगणाऱ्या चंद्रकांत खैरे यांना ठाकरे गटाने छत्रपती संभाजीनगरमधून उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे गेल्या दहा वर्षांपासून लोकसभेच्या तिकीटाची प्रतीक्षेत असणारे अंबादास दानवे पुन्हा एकदा मागे राहिले, त्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

अशातच त्यांनी माध्यमांशी बोलताना मी नाराज नाही असं म्हटलं, पण त्यांनी ठेवलेल्या व्हॉट्सअप स्टेट्सची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. "ये साजिशों का दौर है, और हम कोशिशों मे उलझे हुए है", असा स्टेटस अंबादास दानवे यांनी व्हॉट्सअपवर ठेवलं आहे. त्यामुले ते नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत, तर दानवेंना स्टेट्सच्या माध्यमातून नेमकं काय सांगायचं आहे? असा उपस्थित झाला आहे.

अंबादास दानवे नाराज असल्याच्या चर्चा

छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी दानवे इच्छुक होते. मात्र, आज ठाकरे गटाने जी यादी जाहीर केली त्यामध्ये संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. खैरे यांना उमेदवारी देण्यात आल्याने दानवे नाराज असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

काय म्हणाले अंबादास दानवे?

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विधान परिषेदे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माध्यमांशी संवाद साधून पक्षाच्या मनात माझ्याविषयी दुसरा प्लॅन असल्याचं सांगितलं आहे. शिवाय आपण पक्षावर नाराज नसल्याचंही ते म्हणाले.

तर पुढे बोलताना अंबादास दानवे म्हणाले, पक्षाने पदाधिकारी, जनता यांची मतं जाणून घेऊन उमेदवाऱ्या जाहीर केल्या आहेत. जास्तीत जास्त शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दिल्लीमध्ये पोहोचतील, अशी आम्हाला अपेक्षा आहे. मी २०१४ पासून उमेदवारीसाठी इच्छूक होतो. परंतु मी नराज नाही. शिवसेना आणि पक्षप्रमुखांचं एक नातं आहे. संभाजीनगरसहीत सगळे उमेदवार निवडून आणण्यासाठी मी जीवाचं रान करणार आहे.

व्यक्तिगत हितापेक्षा संघटनेचं हित मला महत्त्वाचं वाटतं. यापेक्षा माझं काहीतरी चांगलं होईल, यापूर्वी संघटनेत जी गद्दारी झाली ती पुन्हा होणार नाही. मी स्वतः उद्धव ठाकरेंना फोन करुन सोबत असल्याचं आश्वस्त केलं. मी एक सामान्य घरातला शिवसैनिक आहे, जिल्ह्याची जबाबदारी पक्षाने माझ्यावर दिलेली आहे. शिवाय विरोधी पक्षनेते पदाची धुरा माझ्याकडेच आहे. त्यामुळे पक्षाने मला खूपकाही दिलेलं आहे. भाजपने सत्ता आणि संपत्तीच्या जोरावर हुकूमशाही सुरु केली आहे. त्यामुळे आमच्यासारख्या इतर पक्षाने ताकदीने उभं राहाणं गरजेचं आहे. असं अंबादास दानवे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT