IMG-20200425-WA0023.jpg 
मराठवाडा

ईवळेश्वर जवळ रुग्णवाहिका उलटली

बालाजी कोंडे


माहूर, (जि. नांदेड) ः माहूर तालुक्यातील ईवळेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका वानोळा येथील रुग्ण आणण्यासाठी जात असताना ईवळेश्वर येथून काही अंतरावर रुग्णवाहिकेला अपघात झाला. अपघातात सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसून चालक सुखरूप आहे.


ईवळेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्राची रूग्णवाहिका (एच.२६. एच.१५१२) शनिवारी (ता.२५) सकाळी दहा वाजता वानोळा येथे प्रसुतीसाठी महिलेला आणण्यासाठी जात होती. ईवळेश्वर येथून काही अंतरावर पवनाळा फाट्याजवळ रूग्णवाहीकेसमोर बकरीचे पिल्लु आले. पिल्लाला वाचविण्यासाठी चालकाने रस्त्याच्या बाजुने रूग्णवाहिका काढण्याचा प्रयत्न केला, पण रूग्णवाहिका रस्त्याच्या खाली कोसळली. सदर अपघातात चालक सुखरूप असून त्यास कुठलीही दुखापत झाली नाही. तर रुग्णवाहिकेचे नुकसान झाले आहे. अपघाताची माहीती मिळताच ईवळेश्वर येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत केली.


स्वस्त धान्य दुकानदारासह महिलांना मारहाण
दुसऱ्या घटनेत कारतळा (ता.कंधार) येथील शासकीय स्वस्त धान्य दुकानदारावर धान्य वाटप करत असताना गावातील काहींनी हल्ला करत इ-पॉस मशीन फोडून धान्य फेकून दिले. तसेच जातीवाचक शिविगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी कंधार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कंधार तालुक्यातील कारतळा येथील दत्ता लक्ष्मन गायकवाड यांच्याकडे शासकीय स्वस्त धान्य दुकान आहे. ते त्यांच्या दुकानात (ता.२०) एप्रिल सकाळी नऊ वाजता स्वस्त धान्य वाटप करीत होते. या वेळी गावातील पंडित निवृत्ती कदम, अनिल विश्वाम्बर कदम, विश्वाम्बर मारोती कदम, नागेश पंडित कदम, तेजेराव विश्वांबर कदम, परमेश्वर मधुकर कदम, व्यंकटी धोंडिबा कदम, मधुकर लक्ष्मण कदम, नागेश अण्णाराव कदम, धनंजय निवृत्ती कदम, तुकाराम गोविंद कदम, अविनाश तुकाराम कदम, हणमंत कदम यांनी संगनमत करुन जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच लाथा बुक्यांनी व काठ्यांनी मारहाण करत दुकानातील धान्य बाहेर फेकून दिले. या वेळी महिलांनाही मारहाण केली. दत्ता गायकवाड यांच्या फिर्यादीवरून वरील १२ जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. परंतु अद्यापपर्यंत आरोपींना अटक करण्यात आली नाही. तपास उपविभागीय पोलिस अधिकारी किशोर कांबळे हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT