amejogai zp girl school found two bags bottles of liquor and condoms
amejogai zp girl school found two bags bottles of liquor and condoms 
मराठवाडा

मुलींच्या शाळेत दारूच्या बाटल्या अन् कंडोम

सकाळ वृत्तसेवा

अंबाजोगाई (जि. बीङ) : येथील मंडी बाजार भागात असलेल्या जिल्हा परिषद मुलींच्या शाळा परिसरात दोन पोती दारूच्या बाटल्या आणि कंडोम आढळल्याने खळबळ उडाली आहे. शिक्षणाचे धडे गिरवणाऱया परिसरात अशा प्रकारचा कचरा आढळल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

जिल्हा परिषद मुलींच्या शाळेत पहिली ते दहावीपर्यंत वर्ग आहेत. शाळेतील मुलींची संख्या 350 आहे. सोमवारी (ता. 17) शाळा सुरू झाली. उन्हाळ्याच्या सुटीनंतर शाळा 45 दिवसांनी सुरू झाल्यानंतर साफसफाईचे काम सुरू करण्यात आले. यावेळी परिसरामध्ये दारूच्या बाटल्या आणि कंडोमचा कचरा मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून आले. दोन पोती कचरा उचलून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. शाळेच्या परिसरात अशा प्रकारचा कचरा आढळून आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. शाळेला सुरक्षा भिंत आहे. मात्र, तिची उंची कमी असल्याने त्यावर चढून किंवा बाहेरून परिसरात हा कचरा फेकला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. शाळेजवळच भाजीमंडई व इतर गजबजलेला परिसर आहे. हा बाजार परिसर रात्री मोकळा असतो.

दरम्यान, शाळेच्या परिसराची नियमित स्वच्छता केली जात आहे. सुटीमुळे शाळा बंद होती. या काळामध्ये उपद्रवी लोकांनी कचरा केला आहे. संबिधितांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांची मदत घेणार आहे, अशी माहिती मुख्याध्यापकांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Datta Bharane: 'तो कार्यकर्ता नव्हता, तर...'; शिवीगाळाच्या व्हिडिओवर दत्ता भरणे यांनी दिलं स्पष्टीकरण

ठाकरे गट विरुद्ध शिंदे गटात राडा, हातकणंगलेत मतदान केंद्रावर कार्यकर्ते भिडले! नेमकं काय घडलं?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सांगोल्यात दोन गटांमध्ये हाणामारी, शेकाप कार्यकर्ते अन् शिवसैनिक भिडले

Latest Marathi News Live Update: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ

Kanhaiya Kumar: कन्हैया कुमार यांच्याकडे एवढी आहे संपत्ती; दिल्लीच्या उमेदवारांमध्ये मनोज तिवारी सर्वात श्रीमंत

SCROLL FOR NEXT